कोपरगाव(वेबटीम) विवेक कोल्हे तुम्ही भान ठेवून बोला.आपण भ्रष्ट पैशात लडबलेले आहात. सहकारात प्रचंड भानगडी करून जमविलेल्या पैशांच्या जोरावरच ...
कोपरगाव(वेबटीम)
विवेक कोल्हे तुम्ही भान ठेवून बोला.आपण भ्रष्ट पैशात लडबलेले आहात. सहकारात प्रचंड भानगडी करून जमविलेल्या पैशांच्या जोरावरच तुमचे राजकारण चालू आहे असल्याची टीका भाजप माजी शहराध्यक्ष सुभाष शिंदे यांनी केली आहे.
शिंदे यांनी म्हंटले की, नगरपरिषदेच्या कामात अडथळे आणून विवेक कोल्हे कोपरगावातील मतदारांचा सूड उगवत आहात.नगराध्यक्ष व आमदारकी हातातून गेल्याने तुम्ही चवताळून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असता.माजी आमदार ताईंनी तर सातत्याने वहाडणे यांचा द्वेषच केला.श्री.विजय वहाडणे यांना तुम्ही असाच विरोध सुरू ठेवला तर येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत "कोल्हे"पराभवाची हॅटरिक झाल्याशिवाय राहणार नाही.शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात काटा मारणारे,पाणी चोरणारे,जनतेच्या पैशांवर आलिशान गाड्या वापरणाऱ्या कोल्हे यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध तोंड बंद ठेवले तर बरे होईल.आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला अवघड होईल हे लक्षात ठेवा.शहरातील मोक्याचे रस्ते झाले तर श्री.वहाडणे यांना श्रेय मिळेल याची तुम्हाला भिती वाटते.जनतेचा अंत पाहू नका अन्यथा तुम्हाला कोपरगावात राजकारण करणे जड जाईल असे शिंदे यांनी म्हंटले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत