बेलापूर(शरद पुजारी) राहूरी तालुक्यातील केसापुर येथील रहिवासी व डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक ज्ञानदेव तुकाराम पवार(वय-६५) यांचे आज अल्प...
बेलापूर(शरद पुजारी)
राहूरी तालुक्यातील केसापुर येथील रहिवासी व डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक ज्ञानदेव तुकाराम पवार(वय-६५) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
स्व.पवार हे डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक होते. तर तनपुरे कारखाना संचलित श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली होती. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत