कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव पोलीस स्टेशन मध्ये तीन महिन्यात नवीन पोलीस अधिकारी बदलून आले , मात्र नवीन पोलीस निरीक्षक बेकायदा व्यवसायाकडे लक्ष द...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव पोलीस स्टेशन मध्ये तीन महिन्यात नवीन पोलीस अधिकारी बदलून आले , मात्र नवीन पोलीस निरीक्षक बेकायदा व्यवसायाकडे लक्ष देतील का ? अशी माफक अपेक्षा लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
मागील तीन महिन्यांपूर्वी कोपरगाव शहरात बदलून आलेले पोलीस अधिकारी यांची नुकतीच बदली झाली कोपरगाव शहरात बेकायदेशीर जुगार, मटका,ऑनलाईन लॉटरी,आदी बेकायदा धंदे पोलीस अधिकारी यांच्या आशीर्वादाने जोरात सुरू आहे.या धंद्यात अनेक राजकीय लोक सहभागी आहेत अशी शहरात जोरात चर्चा आहे. मात्र या कडे पोलीस अधिकारी अर्थपूर्ण स्नेहपूर्ण संबंधातून दुर्लक्ष करत असतात. अनेकदा या बेकायदेशीर व्यवसायाकडे नागरिक आवाज उठवतात मात्र पोलिस या कडे दुर्लक्ष करतात.
लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने हे बेकायदा व्यवसाय बंद व्हावे म्हणून प्रजासत्ताक दिनी धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र कोपरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी यांनी या कडे कानाडोळा केला याउलट शिर्डी येथील बेकायदा व्यवसाय बंद व्हावे म्हणून केलेल्या उपोषणास पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन असे बेकायदा व्यवसाय बंद व्हावे म्हणून विशेष पथक स्थापन करणार असल्याचे जाहीर केले मात्र आजून तरी या पथकाने त्यांची चुणूक दाखवली नाही. शिर्डीतील बेकायदा व्यवसाय व कोपरगाव येथील बेकायदा व्यवसाय यात पोलीस उपअधीक्षक फरक कसा करू शकतात या सर्व सामान्य जनतेस प्रश्न पडला आहे असे असले तरी कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक यांनी बेकायदा दारू,मटका,ऑनलाईन लॉटरी, वाळू बरोबरच गोवंश हत्या आदी कडे लक्ष द्यावे व सर्व सामान्य जनता आपल्या न्याय हक्कासाठी पोलीस स्टेशन मध्ये आल्यास राजकीय दबाव व आर्थिक तडजोडीस महत्व न देता सामान्य व्यक्तीस दिलासा द्यावा ही माफक अपेक्षा व्यक्त करत आहोत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत