पोलीस निरीक्षक देसले यांनी स्वीकारला पदभार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पोलीस निरीक्षक देसले यांनी स्वीकारला पदभार

कोपरगाव(वेबटीम)  कोपरगाव शहराला दोन महिन्यांपूर्वी  लाभलेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची  शिर्डी साईबाबा मंदिर सुरक्षा या ठिकाणी बदली...

कोपरगाव(वेबटीम)


 कोपरगाव शहराला दोन महिन्यांपूर्वी  लाभलेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची  शिर्डी साईबाबा मंदिर सुरक्षा या ठिकाणी बदली झाली असून  अवघ्या दोन महिन्यातच गवळी यांची बदली झाल्याने शहरात चर्चेला उधान आले आहे. पो.नि.गवळी यांच्या जागी  शिर्डी साई बाबा मंदिर सुरक्षा प्रमुख वासुदेव देसले यांची कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात  आल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दि.२३ फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला .त्यानुसार दि २४ फेब्रुवारी पासून देसले यांनी कोपरगाव शहर पोलिस स्टेशन चा आपला निरीक्षक पदाचा  कार्यभार स्वीकारला आहे.


 कोपरगाव शहर पोलिस स्टेशन ला पोलिस निरीक्षक गवळी यांना कोपरगाव शहराचा कार्यभार अवघे दोन महिने मिळाला परंतु  त्यात ते यशस्वी ठरले की अयशस्वी हे कोपरगाव च्या जनता जनार्धनालाच माहिती गवळी  यांच्या आदि पो.नि.राकेश माणगावकर हे कार्यरत होते त्यांनी त्यांचा काळात शहराला मोठ्या प्रमाणात शिस्त लावण्याचा प्रयत्न करत शहरातील गुन्हेगारी देखील आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले होते. कोरोना च्या पहिल्या लाटेत शहरातील कोरोना संख्या आटोक्यात आणण्यात मानगावकर यांनी अथक परिश्रम घेतले होते.मात्र त्यांचा बदली नंतर शहरातील परिस्थिती मध्ये बदल होऊन नागरिकांन मध्ये शिस्त राहिली नाही,  तोंडाला मास्क राहिले नाही, शहरात कुठेही वाहन कोठेही अस्ताव्यस्त लावलेली दिसू लागली आता ही परिस्थिती कशी सुधारेल या कडे नवनियुक्त पोलिस निरीक्षक देसले यांच्या पुढे आव्हान उभे ठाकले असून त्यात कोरोना चा दुसऱ्या लाटेने देखील डोकं वर काढले असल्याने कोपरगाव शहरातील कोरोना रुग्णाची संख्या अर्ध शतक पार झाली असल्याने पहिल्या दिवसापासून साहेबांना आपल्या कामाची चुणूक दाखवावी लागणार आहे.  


 त्यामुळे येणाऱ्या काळात नवनियुक्त पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे कोपरगाव शहरात करोनाच्या पार्शभूमीवर व शहरात चालणाऱ्या अवैध धंद्यावर कसे काम करतात हे पाहणे आता कोपरगाव करासाठी महत्वाच ठरणार आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत