ग्लोबलनगरी फाउंडेशन अमेरिका यांनी राहुरीचे शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे यांच्याशी साधला ऑनलाईन संवाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ग्लोबलनगरी फाउंडेशन अमेरिका यांनी राहुरीचे शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे यांच्याशी साधला ऑनलाईन संवाद

राहूरी(वेबटीम)  ग्लोबलनगरी फौंडेशन, अमेरिका यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे यांचा 'यशाचा महामंत्र शिवतंत्र ...

राहूरी(वेबटीम)

 ग्लोबलनगरी फौंडेशन, अमेरिका यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे यांचा 'यशाचा महामंत्र शिवतंत्र 'हा कार्यक्रम रविवारी अतिशय सुंदररित्या पार पडला. 

ग्लोबलनगरी फौंडेशनचे अध्यक्ष श्री. किशोर गोरे यांनी स्वागत केले. ग्लोबलनगरीचे सेक्रेटरी श्री.रोहित काळे व  फौंडेशनच्या धडाडीच्या कार्यकर्त्या, मोरोक्कोस्थित सौ.रचना फासाटे यांनी या कार्यक्रमाची आखणी आणि सूत्रसंचालन केले. 

ग्लोबलनगरी फौंडेशनतर्फे खूप सुंदर, माहितीवर्धक आणि नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे आयोजन नेहमीच केल जात.डॉ. विजय तनपुरे यांचा विशेष कार्यक्रम हे कालचे एक उत्तम उदाह.

श्री.रोहित काळे यांनी अतिशय सुंदररित्या शिवशाहीर यांच्याशी संवाद घडून आणला. त्यावेळी शाहिरांच्या आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एकोणपन्नसावी भेट व एका पायावर रायगड प्रवास असे व्हिडीओही दाखविण्यात आले. त्यांच्या भारदस्त आवाजाने आणि पोवाडागायन शैलीने सगळेजण मंत्रमुग्ध झाले होते. सर्व वातावरण जणू शिवमय होऊन गेले. 

शिवरायांचा पोवाडा गातांना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे शाहीर हे किती मोठे कलागुण घेऊन जन्माला आलेले असतात याची काल प्रचिती आली.असे हे बहु्गुणी सुपुत्र जे आपल्याच भूमीत वाढलेत.त्याच्या कलागुणांची दखल ग्लोबलनगरीने घेतली. 

डॉ. विजय तनपुरे यांचा खडतर जीवन संघर्ष आणि अती प्रचंड ध्येय वृत्तीने त्यांनी वयाच्या दुसऱ्या वर्षी आलेलं पोलिओचे संकट कसे विषासमान पचवले आणि जेथे सर्व काही बेचिराख झाले असे वाटले तेव्हा फिनिक्स पक्ष्यासारखे राखेतूनही पुन्हा जन्म घ्यावा तसा त्यांनी स्वतःचा इतिहास घडवला. आज ते विश्वशाहीर सर्वदूर प्रसिद्ध आहेत. 135 पोवाड्यांचे लिखाण आणि गायन करणे हे साध्या व्यक्तीचे काम नाही ते बाळकडू जन्मजात असावं लागत. हे सर्व करत असतांना सोबतच अपंगांसाठी शिवाश्रमची निर्मिती सारखे मोठे काम पण त्यांनी हाती घेतले आहे. 

ग्लोबलनगरीचे तंत्र सल्लागार श्री.प्रमोद कारले यांनी  फेसबुक लाईव्ह आणि सर्व तांत्रिक बाबी अगदी नियोजनबद्ध हाताळत पडद्यामागची भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडली.. सोबतच ग्लोबलनगरीचे खजिनदार श्री. अविनाश मेहेत्रे यांनी कॉलचे अडमिनिस्ट्रेशन सांभाळले. 

या कार्यक्रमामध्ये जगभरातील सात खंडातून रसिकानी हजेरी लावली व शाहिरांशी दिलखुलास प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाची सांगता शिवगर्जना करून करण्यात आली . सदैव लक्षात राहील असा हा कार्यक्रम पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत