राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत भागात वास्तव्यास असलेल्या एका वैद्यकीय क्षेत्रासंबधित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
राहूरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत भागात वास्तव्यास असलेल्या एका वैद्यकीय क्षेत्रासंबधित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मद्यपान करून धिंगाणा घालण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या दोन दिवसांपूर्वी स्थानिक तरुण व महाविद्यालयीन तरुण यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहूरी फॅक्टरी परिसरात सुशिक्षित व सदन कुटुंबातील नागरिक वास्तव्यास असलेल्या आदिनाथ वसाहत या भागात अनेक बंगला मालकांनी एका वैद्यकीय क्षेत्रसंबंधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भाडोत्री तत्तावर रूम दिलेल्या आहेत. सदर विद्यार्थी नशापाणी करून धिंगाणा घालणे, रेस करून गाडी चालविणे, किरकोळ बाचाबाची आदी प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी स्थानिक तरुण व विद्यार्थी यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली.
दरम्यान काल आदिनाथ वसाहत येथील रहिवासी यांची बैठक पार पडली.या बैठकीत विद्यार्थ्यांकडून होणारा त्रास रोखायचा कसा याबाबत चर्चा झाली. रूम मालकांनी विद्यार्थ्यांना भाडेतत्त्वावर रूम देताना विद्यार्थ्यांना योग्य ती तंबी देणे गरजेचे असून स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन बैठकीत ठरले. आदिनाथ वसाहत मित्र मंडळांचे प्रतीक जोशी, समीर शेख, प्रदीप गरड,योगेश मुसमाडे, राहुल ठाणगे,राजू लांडगे, पारस चोरडिया, श्रीकांत मेळवणे,खंडू सूर्यवंशी, निलेश कुंभार, कल्पक धावडे, सुमित सोज्वळ, धवल धुलेकर, संतोष शिंदे, स्वराज जगताप, धीरज जगताप, अजिंक्य चव्हाण, सारंग खड्डकर, गजानन घुगरकर, अमित गोलांडे आदी उपस्थित होते.
कल्पना चावला उद्यान बनले प्रेमीयुगलांचा अड्डा!
आदिनाथ वसाहत येथे देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अंतर्गत असलेले कल्पना चावला उद्यानात राजरोजपणे महाविद्यालयीन तरुण-तरुणी प्रेमाच्या गप्पा गोष्टी करत तसेच अश्लिल चाळे करत बसलेले असतात. स्थानिक राहिवाशी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. लहान मुले व वयोवृद्ध व्यक्ती यांच्यासाठी असणारे कल्पना चावला उद्यान प्रेमीयुगलांचा जणू काही अड्डाच बनले असल्याने देवळाली प्रवरा नगरपालिकेने सदर उद्यानात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत