देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.सोमवार दि.22 रोजी एका शेतकरी कुटुंबातील ५ जण कोरोना बाधित असल...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.सोमवार दि.22 रोजी एका शेतकरी कुटुंबातील ५ जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरातील नागरीकांनी धास्ती घेतली आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर प्रशासन माञ कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा शहरात कोरानाने डोके वर काढले आहे.गेल्या आठवड्यात एका २७ वर्षीय तरुण व ५२ वर्षीय व्यक्ती यांचा कोराना मुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर एका पाठोपाठ रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी एक रुग्ण तर सोमवार एका कुटुंबातील ४ व्यक्ती व पाहुण्या म्हणून आलेल्या एक महिला असे एकुण ५ जण कोराना बाधित असल्याचा अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
शहरात विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना पासुन काळजी घेणाऱ्या नागरीकांनी नाराजी व्यक्त करीत आहे.प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत