देवळाली प्रवरा(वेबटीम) वर्गणी द्या, नाही तर तुम्ही देशद्रोही आहात.वर्गणीच्या नावाखाली भाजपाचे काही पुढारी खंडणी गोळा करत असल्याचा आरोप आ.का...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
वर्गणी द्या, नाही तर तुम्ही देशद्रोही आहात.वर्गणीच्या नावाखाली भाजपाचे काही पुढारी खंडणी गोळा करत असल्याचा आरोप आ.कानडे यांनी करून काँग्रेसमध्ये त्यांना मानसन्मान होता, त्यांनी सत्तेत भरपेट खावून भरधाव धावणाऱ्या भगव्या अश्वाला पाहुन तेही पळाले पण त्यांना भगव्या वातावरणात किती मान सन्मान मिळतो हे आज दिसत असल्याची टीकाही आ.कानडे यांनी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर नाव न घेता केली आहे.
महसुलमंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण कार्यकर्त्यांचा मेळावा देवळाली प्रवरात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कृष्णा मुसमाडे हे होते. त्यावेळी आ.कानडे बोलत होते. यावेळी भाजपाचे काही पुढारी वर्गणी गोळा करण्या ऐवजी खंडणी गोळा करीत आहे. जर कोणी वर्गणी दिली नाही तर तुम्ही देशद्रोही आहात. रामराम करण्याऐवजी जय श्रीराम म्हणा असे सांगितले जाते.भावनात्मक लाटा तयार करुन सत्ता काबीज करण्याचा यांचा डाव आता जनतेच्या लक्षात आला आहे.
यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डाँ.सुधीर तांबे, ज्ञानदेव वाफारे, काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण ,श्रीरामपूर नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे,सचिन गुजर, अमृत धुमाळ,गणपतराव सांगळे,अंकुश कानडे,राजेंद्र बोरुडे, युवक शहराध्यक्ष कुमार भिंगारदे,जयेश माळी,गिताराम बर्डे, आदींनी भाजपावर सडकुन टिका केली.कार्यक्रमाचे प्रास्तविक बाळासाहेब खांदे यांनी केले.
यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे,अशोक खुरुद, अमृत धुमाळ,सुखदेव मुसमाडे,उत्तमराव कडू, कुणाल पाटील, भाऊराव कांगुणे, संजय पोटे, माजी नगराध्यक्ष इंदुमती खांदे, भाग्यश्री कदम, उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव गिरमे यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत