कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहरातील निवारा मित्रमंडळ ट्रस्ट संचलित श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने निवारा, सुभद्रानगर, कोजागिरी कॉलनी, ओ...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील निवारा मित्रमंडळ ट्रस्ट संचलित श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने निवारा, सुभद्रानगर, कोजागिरी कॉलनी, ओमनगर, द्वारकानगरी, जानकीविश्व, रिद्धीसिद्धी नगर, आढाव वस्ती, शंकरनगर, आदि परिसरातील जेष्ठ-श्रेष्ठ नागरिक व महिलांसाठी तिळगुळ व हळदी-कुंकू समारंभ निवारा परिसरातील महादेव मंदिरा समोरील प्रांगणात उत्सहात संपन्न झाला.
या कार्यक्रमप्रसंगी श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्यावतीने कोरोनामुळे खंडित झालेले विविध उपक्रम सुरु करण्यात आले असून विशेषत: निवाऱ्यातील कै.आसाराम पाटील आढाव उद्यानात कोरोना काळात वाढदिवस होऊन गेले त्या नागरिकांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या नगरसेविका सौ.दीपाताई गिरमे, श्रेष्ठ नागरिक मित्रमंडळाच्या मार्गदर्शिका सौ.सुहासिनीताई कोयटे, अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार, सौ.कर्डकताई, तसेच मित्रमंडळाचे इतर पदाधिकारी आदींच्या हस्ते करण्यात आला. हळदी-कुंकूवासाठी उपस्थित असलेल्या जेष्ठ-श्रेष्ठ महिलांना वाण म्हणुन समता महिला बचत गटाने तयार केलेल्या अगरबत्तीचा पुडा व तिळगुळ देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलतांना काका कोयटे म्हणाले की, जेष्ठ श्रेष्ठ नागरिक हा भारतीय संस्कृती आणि परिवाराचा कणा आहे. त्यांच्यामुळे आज भारतीय संस्कार, संस्कृती टिकून आहे. त्यांचा आदर करणे प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. जेष्ठ नागरिकांनी देखील घरात लक्ष देतांना योग्य ती काळजी घ्यावी आणि जिथे गरज पडेल तिथेच मार्गदर्शन करावे. जेष्ठ नागरिकांसाठी शासनाने देखील भक्कम कायदे करून चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा सुकर मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करावा. जेष्ठांनी देखील स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत