ना.थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस शाखांचे उदघाटन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ना.थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस शाखांचे उदघाटन

  कोपरगाव प्रतिनिधी नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस बळकटीकरणासाठी १ फेब्रु...

 कोपरगाव प्रतिनिधी

नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस बळकटीकरणासाठी १ फेब्रुवारी २०२१  ते ७ फेब्रुवारी २०२१ या   कालावधीमध्ये काँग्रेस बळकटीकरण सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने  कोपरगांव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस उक्कडगांव व आपेगांव या गावात काँग्रेस शाखेच्या उदघाटन  करण्यात आले .

 या कार्यक्रमास नितीनराव शिंदे तालुकाध्यक्ष , ज्ञानेश्वर भगत उपाध्यक्ष, चंद्रहार जगताप, बाळासाहेब निकम, गंगाधर राऊत, गणेश निकम, भाऊसाहेब बागुल, भिमराज निकम, विलासराव गव्हाळे, सुभाष गव्हाळे, बाळासाहेब पगारे, कचरू भुजाडे, समाधान रोहकले हे मान्यवर हजर होते.

  यावेळी शिंदे यांनी बोलताना सांगितले की गेल्या वर्षभरात काँग्रेस अत्यंत आक्रमक रीत्या कार्य करीत असून जनतेच्या प्रश्नांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकां साठी पक्ष अविरतपणे झटत आहे विविध आंदोलने उपक्रम  तालुक्यात राबविण्यात येत आहे. तालुक्यामध्ये पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे.

 या प्रसंगी सर्व कॉग्रेस पदाधिकारी यांनी शेतकरी काळा कायद्यावर व शेतकरी प्रश्नावर केंद्र सरकारवर कडाडून टीका करत राज्यातील महाआघाडी  सरकारचे शेती कर्ज माफी बद्दल आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत