वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव

 कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यात वाळु चोरी विरोधी पथकांनी गोदावरी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करीत असतांना जप्...

 कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यात वाळु चोरी विरोधी पथकांनी गोदावरी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले होते पंरतु उक्त वाहनाचे मालक यांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेले नसल्यामुळे अशाप्रकारचे वाहने लिलावाद्वारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करणेकामी दि २ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वा तहसिल कार्यालय कोपरगाव येथे जप्त केलेल्या वाहनांचे लिलाव करण्यात येत आहे.

 तरी जास्तीत जास्त ईच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी लिलावात भाग घ्यावा. लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेले वाहने, लिलावात हातची किंमत, इ. बाबत कार्यालयीन वेळेत तहसिलदार कोपरगाव यांचेशी संपर्क साधावा असे आव्हान  कोपरगाव चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत