वळण/गोविंद फुणगे राहुरी तालुक्यातील सडे गावाला यावर्षीचा आर.आर.पाटील सुंदर ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पालकमंत्री हसन मुश...
वळण/गोविंद फुणगे
राहुरी तालुक्यातील सडे गावाला यावर्षीचा आर.आर.पाटील सुंदर ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रशिस्तपञ आणि दहा लाख रूपयांचा हा पुरस्कार सरपंच,ग्रामसेवक, सदस्य यांच्याकडे देण्यात आल आहे.
सडे या गावाने या योजनेत सहभाग घेऊन शासन स्तरावरील विविध योजना योग्य पद्धतीने राबविल्या आहेत.गावातील विविध भागातील परीसरात लोकसभातुन विकास साधला आहे.याचीच शासनाने दखल घेऊन सन.२०२०-२१ वर्षातील तालुकास्तरीय प्रथम क्रमांक या ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे.मंगळवार दि.१६ फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथील माऊली संकुलात पुरस्काराचे वितरन सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा राजश्री घुले ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके,जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापती मीरा शेटे, उमेश परहर,काशिनाथ दाते, सुनील गडाख, क्षितिज घुले,गटविकासाधिकारी गोविंद खामकर,विस्तार अधिकारी डी.जी.दळे,बी.एस फुगारे,सभापती बेबीताई सोडणर ह्या उपस्थित होत्या.यावेळी बाळासाहेब लटके,प्रदीप पवार, उर्मिला राऊत आदिंसह सडे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत पानसंबळ, उपसरपंच अमोल धोंडे, बाळासाहेब लहारे,धीरज पानसंबळ, नवनाथ शिंदे , कोमल गणेश घोरपडे, कल्पना संदीप साळवे, सिंधूबाई अरुण फाटक, आशाबाई पवार, बिस्मिल्ला पठाण, उषाताई अरुण धामोरे, रावसाहेब नन्नवरे, गणेश घोरपडे, विक्रम फाटक, धनंजय पानसंबळ,कलीम पठाण, विनय गरुड, कृष्णा धोंडे, प्रभाकर दिवे, लक्ष्मण कनगरे, जालींदर शिंदे, ग्रामसेवक महेश जंगम ,तत्कालिन ग्रामसेविका वनिता कोहकडे, राम कार्ले, संतोष राठोड,वसंतराव राऊत,संजय गिर्हे, बाळासाहेब गागरे,किसन भिंगारदे,संभाजी निमसे भाऊसाहेब राशीनकर, संजय डौले,रवींद्र लांबे,सचिन कल्हापुरे,गणेश पाखरे,राजेंद्र बोठे, सुनील कोरडे,रोहिदास भोंदे,गोविंद गांधले, शिवाजी पल्हारे, अशोक खळेकर, मोहन परभाणे, मच्छीन्द्र कटारनवरे,सखाहरी थोरात,प्रकाश गायकवाड आदिं उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,सूत्रसंचालन उध्दव काळापहाड,गौरी जोशी यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत