वळण(प्रतिनिधी ) राहुरी तालुक्यातील वळण येथील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित महिला सदस्या लिलाबाई गोसावी यांनी प्रभाग क्र.४मधील खराब झाल...
वळण(प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील वळण येथील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित महिला सदस्या लिलाबाई गोसावी यांनी प्रभाग क्र.४मधील खराब झालेल्या रस्त्याचे व गटारीचे काम तात्काळ मार्गी लावल्याने त्यांचे ग्रामस्थांमधुन कौतुक केले जात आहे.
येथील नवनिर्वाचित महिला सदस्या लिलाबाई सिताराम गोसावी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान येथील प्रभाग क्रमांक चार मधील आदिवासी स्मशानभूमी बाबद तसेच येथील सांडपाण्याच्या व्यवस्था बाबत नागरिकांना शब्द दिला होता.
तर निवडणुकीनंतर विजय झाल्यावर काही दिवसातच त्यांनी शासकीय निधीची मदत किंवा शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता स्वखर्चातून प्रभाग क्रमांक चार मधील गावठाण परिसरामध्ये महत्त्वाचा नादुरुस्त झालेला रस्ता दुरुस्त केला तसेच आवश्यक त्या ठिकाणी सिमेंट च्या नळ्या टाकून बाजूने साईट गटारही जेसीबीच्या सहाय्याने केली तर आदिवासी स्मशानभूमीतील वाढलेले झाडे-झुडुपे काट्या याठिकाणी जेसीबीच्या साह्याने त्वरित साफसफाई केली त्यामुळे या हा परिसर काही वेळातच स्वच्छ झाला त्यामुळे त्यांच्या या कामाचे कौतुक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत