अहमदनगर(वेबटीम) अहमदनगर येथील नवनागापूर येथील गजानन कॉलनीतील अँप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त द...
अहमदनगर(वेबटीम)
अहमदनगर येथील नवनागापूर येथील गजानन कॉलनीतील अँप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दिनांक १९ ते २० फेब्रुवारी दरम्यान भव्य मोफत रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज जीवनदायीनी योजनेचा शुभारंभ आ. निलेश लंके यांच्या हस्ते आयोजित केला असल्याची माहिती डॉ.सागर गडाख यांनी दिली.
शुक्रवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते २ या वेळेत मोफत अस्थिरोग, संधिवात, हाडांच्या ठिसूळपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणकेविकार, हाडांचे फ्रॅक्चर यावर अस्थिरोग तज्ञ डॉ.दीपक कळमकर मार्गदर्शन व उपचार करणार आहेत. कान, नाक, घसा यावर तपासणी डॉ.वैजनाथ गुरवले करणार आहे. अँपेडिक्स, हर्निया, थायरॉईड,पोटाच्या सर्व तपासण्या डॉ.अशोक शिंदे करणार आहेत. तसेच शनिवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोफत मधुमेह, रक्तदाब,हृदयविकार, पक्षवात, दमा व फुफ्फुसाचे आजार, थायरॉईड, किडनी विकार आदी बाबत डॉ.विशाल भोसले मार्गदर्शन करणार आहेत.
मोफत प्रसूतीपूर्व तपासण्या व उपचार, वंध्यत्व निवारण व चिकित्सा, मासिक पाळीच्या समस्या,स्तनविकार, किशोरवयीन मुलींच्या समस्या व इतर सर्व स्त्री रोग तपासणी डॉ.संतोष कचरे, डॉ.प्रदीप इंगळे, डॉ.प्रियंका गडाख करणार आहेत. तर वय वर्ष १२ पर्यतच्या सर्व मुलांची मोफत तपासणी व उपचार तसेच सदृढ बालक व बालविकास मार्गदर्शन डॉ.सचिन सोलट,डॉ.लक्ष्मण चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.सागर गडाख, डॉ.शुभम गडाख व डॉ.अतिष केदारी यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत