चोथे वस्ती येथे उद्या १९ फेब्रुवारी रोजी महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे कीर्तन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चोथे वस्ती येथे उद्या १९ फेब्रुवारी रोजी महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे कीर्तन

  राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील जुन्या देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी रोडवरील चोथे वस्ती पेपर मिल रोड अण्णासाहेब चोथे मित्र मं...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

राहुरी तालुक्यातील जुन्या देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी रोडवरील चोथे वस्ती पेपर मिल रोड अण्णासाहेब चोथे मित्र मंडळाच्या आयोजित श्री. साई चरित्र पारायण सोहळा सांगता निमित्ताने दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता महंत उद्धव महाराज मंडलिक(नेवासेकर) यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

  राहूरी कारखाना नजीक असलेल्या चोथे वस्ती येथील  अण्णासाहेब चोथे मित्र मंडळाच्या वतीने श्री साई चरित्र पारायण सोहळा सुरू असून या निमित्ताने असंख्य भाविक साई चरित्र पारायण सोहळ्यात सहभागी झाले आहेत.हरिपाठ, भजन, आरतीने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

 दरम्यान शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता ग्रंथ अवतरणिका तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व  त्यानंतर ९.३० वाजता ह.भ. प महंत उद्धव महाराज मंडलिक(नेवासे) यांचे काल्याचे जाहीर हरिकीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून भाविकांनी मास्क सॅनेटायझर आदींचा वापर करून उपस्थित रहावे असे आवाहन नगरसेवक आण्णासाहेब चोथे मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत