राहुरी(वेबटीम) बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असून या बँकेच्या माध्यमातून सुरू ...
राहुरी(वेबटीम)
बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असून या बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांच्या अडचणी दूर होतील व त्यांना लवकरात लवकर आपला व्यवहार करता येईल असे प्रतिपादन बँक ऑफ बडोदा चे देवळाली प्रवरा शाखाधिकारी कैलास गांगर्डे यांनी केले आहे.
राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्रीराम मंदिर चौकामध्ये बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन बँकेचे शाखाधिकारी कैलास गांगर्डे , बँकेचे अधिकारी श्रीकांत बडे ,पांडुरंग डुकरे ,जयश्री निकम ,कोमल बोचरे, मनोज शिंदे, निलेश चित्राल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना शाखाधिकारी कैलास गांगर्डे यांनी सांगितले की , ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही हे ग्राहक सेवा केंद्र सुरू केलेले आहे ग्राहकांना या केंद्राच्या माध्यमातून जनधन खाते खोलने मनी ट्रान्सफर फंड ट्रान्सफर विमा उघडणे पासबुक प्रिंट करणे पैसे काढणे व टाकने बँक खात्याला आधार व मोबाईल नंबर लिंक करणे थर्ड पार्टी डिपॉझिट करणे एफ डी पावती करणे आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत या केंद्राचा सर्व ग्राहकांनी उपयोग करून फायदा घ्यावा असे आव्हान गांगर्डे यांनी यावेळी केले. या केंद्राचे चालक अनिल सोन्याबापु घाडगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत