प्रसादनगर झोपडपट्टी धारकांची निवासी अतिक्रमणे नियमित करा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रसादनगर झोपडपट्टी धारकांची निवासी अतिक्रमणे नियमित करा

राहूरी(वेबटीम)       देवळाली प्रवरा हद्दीतील  प्रसादनगर झोपडपट्टी धारकांची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून द्यावीत अशी मागणी करणारे निवेदन ...

राहूरी(वेबटीम)

      देवळाली प्रवरा हद्दीतील  प्रसादनगर झोपडपट्टी धारकांची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून द्यावीत अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र तुकडेबंदी संघर्ष समन्वय समिती व राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन संघटना यांचे संयुक्त विद्यमाने राहुरी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ दयानंद जगताप यांना शिष्टमंडळाने दिले. त्या प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा महाराष्ट्र तुकडेबंदी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस बोलत होते. 

      या निवेदनावर महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस यांचेसह, समितीचे कोश्याध्यक्ष तथा  राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे, समितीचे सचिव तथा योग प्रशिक्षक किशोर थोरात, समितीचे उपाध्यक्ष तथा डॉ. केमिस्ट चे चेअरमन डॉ. विलास पाटील, समितीचे सदस्य तथा देवळाली प्रवरा शिवसेना शहर प्रमुख सुनील कराळे, समितीचे  सदस्य तथा  देवळाली प्रवरा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, समितीचे सदस्य तथा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक तुषार शेटे, समितीचे सदस्य तथा  शिवसेनेचे नेते संतोष चोळके यांच्या तर राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण लोखंडे, महिला जिल्हा अध्यक्ष यमुनाताई भालेराव, तालुका अध्यक्ष बाबासाहेब साळवे , महिला तालुका अध्यक्ष रजनी प्रभाकर कांबळे यांनी स्वाक्षरी केली आहे. 

      पुढे बोलताना ढुस म्हणाले की, प्रसादनागर च्या गट नंबर ५४२ मध्ये जवळपास ४० वर्षे पासून मागासवर्गीय बहुल झोपडपट्टी धारक वास्तव्यास आहेत.

      देवळाली प्रवरा नगरपालिकेने प्रसादनागर चा गट नंबर ५४२ हा भाग स्लम (झोपडपट्टी) म्हणून घोषित करण्यासाठी ठराव पारित करून अहमदनगर चे जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे प्रस्ताव पाठविला आहे. 

      महाराष्ट्र शासनाच्या सन २००२ च्या शासन निर्णयातील नियम क्र.४ मध्ये निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण धारक हा मागासवर्गीय असेल तर त्यांना ती जमीन विनामूल्य प्रदान करण्याची तरतूद आहे.  त्यानुसार अहमदनगर च्या मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी दि. ६/५/२०१९ रोजी देवळाली प्रवरा   येथील गट नंबर ५४२ मधील प्रसादनगर झोपडपट्टी नियानुकूल करणे बाबत राहुरीच्या तहसील कार्यालयाला नियमोचित सूचना दिलेल्या आहेत. तथापि अद्याप पावेतो त्यावर कार्यवाही झालेली नाही. 

                     *जाहिरात*

      

म्हणून देवळाली प्रवरा येथील  गट नंबर ५४२ व ५४४ मध्ये झोपडपट्टी धारकांनि निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे तात्काळ नियमानुकूल करावीत अशी विनंती प्रांत साहेब डॉ दयानंद जगताप यांचेकडे ढुस यांनी सिस्टमंडळासह केली असून याची चौकशी करून पुढील कार्यवाही करू असे प्रांत डॉ दयानंद जगताप साहेब यांनी सांगितले असलेने ढुस यांनी बोलताना सांगितले. 

        तसेच या प्रसंगी राहुरी फॅक्टरी येथील चिंचविहिरे शिवे लगत असलेला गुंजाळ नाका ते प्रसादनगर या शिव रस्त्याचे अतिक्रमण हटवून हा शिव रस्ता मोकळा करून देणेची विनंतीही सिस्टमंडळाने केली असून तो रस्ता मोकळा करण्याची लवकरच कार्यवाही केली जाईल असे प्रांत डॉ दयानंद जगताप साहेब व तहसीलदार फसियोद्दीन  शेख साहेब बोलले असल्याचे ढुस यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत