आमदार लहू कानडेंना हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागणार-कांबळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आमदार लहू कानडेंना हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागणार-कांबळे

राहुरी (प्रतिनिधी) श्रीरामपूर मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आमदार लहू कानडे यांनी ऐतिहासिक हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले पवित्र श्रीराम मंदिराच्य...

राहुरी (प्रतिनिधी)



श्रीरामपूर मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आमदार लहू कानडे यांनी ऐतिहासिक हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले पवित्र श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राम भक्त रात्रंदिवस निधी गोळा करत आहे परंतु त्यांना समर्थन द्यायचे सोडून खंडणीखोर म्हणून संपूर्ण हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम करणारे आमदार लहू कानडे यांनी आपली प्रतिमा पहावी व हिंदूंचा अपमान होईल असे भाष्य आपल्या कोणत्याही भाषणात करू नये याबाबत त्यांनी विचार करावा अन्यथा त्यांना भा.ज.पा. कार्यकर्ते व श्रीराम भक्त यांच्याकडून धडा शिकवला जाईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे राहुरी तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष नामदेव कांबळे यांनी केला आहे. 

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी देशभरातील सामान्यातील सामान्य माणूस स्वतःहून निधी देऊ लागल्याने काँग्रेसच्या नेत्यांची मरगळ झाली आहे त्यामुळे सदरचा निधी योग्य ठिकाणी जातो की नाही असा प्रश्‍न त्यांना वाटू लागला आहे. ऐतिहासिक मंदिरासाठी निधी गोळा करण्याचे काम पूर्णत: पारदर्शक पद्धतीने होत असताना श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहू कानडे यांनी आपल्या मतदार संघातील विकास कामाचा व आपल्या प्रतिमेचा योग्य आढावा घ्यावा मगच राष्ट्रनिर्मिती या पवित्र कार्यात चूक असेल तर शिंतोडे उडवावे असे रोखठोक उत्तर भाजपा युवा मोर्चा राहुरी तालुका उपाध्यक्ष नामदेव कांबळे यांनी देऊन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

      ऐतिहासिक मंदिराच्या उभारणीसाठी प्रभू श्रीराम भक्तांसह सर्वांचाच हातभार लागावा यासाठी लोकवर्गणी गावागावातून जमा होत आहे व मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावरून गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण करणाऱ्या सत्ताधारी पक्षामध्ये नकारात्मक वातावरण दिसून येते आहे. आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे याची सर्व सामान्य माणसाला खात्री आहे त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही श्रीराम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. याच पवित्र कामी श्रीरामपूर चे आमदार लहू कानडे भक्तांवर खंडणीखोरीचा आरोप केला आहे. पण त्यांनी निधी ज्या प्रकारे गोळा केला जातो व त्या बाबतीत त्याची पावती सुद्धा दिली जाते. परंतु मंदीराच्या पवित्र कामातही राजकीय मतभेद मनात ठेवून काँग्रेस पक्षाचे नेते हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम करतात. राष्ट्र निर्माणासाठी असलेल्या या पवित्र कामावरती आक्षेप घेणाऱ्यांची प्रतिमा खरोखर योग्य आहे का याबाबत त्यांनी अभ्यास करावा असे कांबळे यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत