राहूरी फॅक्टरी(वेबटीम ) राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या गुन्हेगारी विरोधात झालेल्या आंदोलनाला अनेक अवैध धंद्यावाल्याने हजेरी लावल्याने या आंद...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या गुन्हेगारी विरोधात झालेल्या आंदोलनाला अनेक अवैध धंद्यावाल्याने हजेरी लावल्याने या आंदोलनाला गुन्हेगारीचा वास येत असल्याची चर्चा आंदोलनाचे झेंडे गुंडाळल्यानंतर सुरू असून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी देवळाली व राहूरी फॅक्टरी येथे राहुरीच्या हनुमंता समोर अचानक लावण्यात आलेला हा "सत्यदिपक"किती दिवस तेवत राहणार हे काळच ठरवणार आहे.
राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा व परिसरात गुन्हेगारीने उच्छाद मांडला असून सामान्य नागरिक व्यापारी शालेय, विद्यार्थी, विद्यार्थिनी,यांना जगणं नकोसं झालं आहे. याबाबत अनेक नागरिकांची कुचंबना होत असल्याने काही सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लहान-मोठ्या नेतेमंडळींनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यात ते यशस्वी झाले प्रशासनाच्या विनंतीनुसार रास्ता रोको ऐवजी चर्चेतून मार्ग काढण्याचा निर्णय झाला, आणि "तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो"असे करत पोलीस व गाव पुढार्यांनी आता गुन्हेगारी थांबेल व नवे पर्व सुरू होईल असा आव आणून आंदोलनाचे झेंडे गुंडाळून ठेवले. गुंडाळलेले झेंडे अडगळीत पडण्याच्या अगोदरच राहूरी फॅक्टरी परिसरात एका नव्या चर्चेला उधाण आले. कारण त्या आंदोलनात जे लोक सहभागी झाले होते.त्यामध्ये गुन्हेगारीच्या समस्येबद्दल तळमळ असणारे खूप जण होते हे सत्य आहे. मात्र त्यामध्ये गुन्हेगारांची संख्या काही कमी नव्हती त्याचबरोबर गुन्हेगारांना पाठीशी घालणारे व त्यांना गुप्तपणे मदत करणारे.त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून तडजोड करणारे,असे अनेक भक्त, स्वयंघोषित वकील देखील सहभागी होते हे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे सर्व चित्र त्या आंदोलनात दिसले. त्यामुळे नेमके आंदोलन कोणासाठी व कशासाठी केले गेले, या चर्चेला उधाण आले आहे.
राहुरीत तिसर्यांदा बदलून आलेले पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे हे देखील आंदोलनस्थळी उपस्थित होते. 'हुनमंतराय 'आंदोलन स्थळी येणार असे समजल्यानंतर यांच्यावर निष्ठा असलेले त्यांचे प्रिय 'भक्त' देखील हजर झाले . कारण अनेक वेळा हनुमंतरायांची मर्जी या बहादूर लोकांवर झालेली आहे. तुम्ही तक्रार द्या मी गुन्हा दाखल करतो असे विधान हनुमंतरायाने केले. म्हणजे काम संपले असा त्याचा अर्थ नाही. पोलीस स्वतः कधी भूमिका घेणार, अनेक लोक निमूटपणे अन्याय सहन करत आहेत. याचं कारण पोलीस प्रशासन त्यांना मदत करत नाही हेच आहे, आणि हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. गुन्हेगाराच्या विरोधात तक्रार देणं सामान्य माणसाला त्रासदायक असतं. हे पोलिसांना देखील माहित आहे सर्व जण तक्रार द्यायला पुढे येत नसतील तर पोलिसांनी आपण होऊन गुन्हे नोंदविले पाहिजेत गुन्हेगारांना शासन होईल किंवा पोलीस आल्या ची चाहूल लागली तरी गुन्हेगारांचा थरकाप उडाला पाहिजे असे पोलीस प्रशासन आम्हाला कधी लाभेल असा प्रश्न राहुरी फॅक्टरी येथील जनता विचारत आहे.
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीच्या अपहरणाचा प्रयत्न होण हे या परिसरासाठी अत्यंत लज्जास्पद आहे तीन वेळा राहुरीचा कार्यभार पाहून देखील पीआय गाडे यांना गुन्हेगारीचा अंदाज येत नसेल तर नवलच म्हणावं लागेल. राहूरी फॅक्टरी येथील गुन्हेगारीबाबत बीट हवालदार व कॉन्स्टेबल हे देखील गाडे साहेबांना माहिती देत नसतील का? असही नागरिक बोलत आहेत.
गुन्हेगारांच्या गळ्यात गळे घालून टेबलावर बसून मटणाच्या काळ्या पिशव्या वाहणारे पोलीस राहूरी फॅक्टरी व देवळालीकरांसाठी नवीन नाहीत. तेव्हा गुन्हेगारी आटोक्यात येईल अशी धुसर शक्यता देवळालीकर व राहूरी फॅक्टरीकरांना वाटत नाही. आंदोलनात आणखीही लोक सहभागी होते त्यांना पण लोकांनी ओळखलेले आहे.
निवडणुका जवळ आल्या की आंदोलने,मोर्चे, मेळावे असे कार्यक्रम होत असतील तर त्यात सोईस्कर पणे सहभागी होणे या गोष्टी परिसरात घडत असतात घडूनही आणल्या जातात आंदोलनकर्त्यांसमोर बोलणाऱ्या जबाबदार व्यक्तीनी पोलिसांना जमत नसेल तर आम्ही गुन्हेगारांचा बंदोबस्त करू असे भाष्य करून शेखी मिरवलीहेही सगळ्यांनी बघितले आहे. हे जर तुम्हाला शक्य आहे हे जर तुम्हाला करता येतं तर तुम्ही अगोदरच या गोष्टीला आळा घालणं गरजेचं होतं असही लोक सांगत आहेत कधीही एकत्र न येणारे लोक अचानक एकत्र येऊन जनतेशी संवाद साधून गोड गोड बोलू लागतात. त्यावेळी निवडणुका जवळ आल्यात असं गावातलं शेंबडी पोरही सांगत असतात.
त्यामुळे गुन्हेगारांनी,पुढाऱ्यांनी आणि पोलिसांनी एकत्र येऊन किंवा अनैसर्गिक पण एकत्र येऊन लोकांसमोर अकलेचे तारे तोडले. शहरात सर्व आलबेल आहे असे लोकांना पटवून देणे हे न समजण्याइतकी येथील जनता दूध खुळी नाही. गुन्हेगारी थांबवण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असून त्यावर काय काय कारवाई केली जाते हे कारवाई झाल्यानंतरच स्पष्ट होईल आणि मग चर्चेला पूर्णविराम भेटेल असे सध्या तरी वाटत आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत