कोपरगाव प्रतिनिधी कोप रगाव नगरपरिषेतील नगरसेवक विजय वाजे यांनी बुधवार १० फेब्रुवारी रोजी पाणी पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्यास अरेरावीची भा...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगरपरिषेतील नगरसेवक विजय वाजे यांनी बुधवार १० फेब्रुवारी रोजी पाणी पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्यास अरेरावीची भाषा वापरल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुद्दत काम बंद आंदोलन पुकारले होते परंतु गुरुवार रोजी हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केली.
कोपरगाव नगरपरिषेतील नगरसेवक विजय वाजे यांनी बुधवार १० फेब्रुवारी रोजी विविध समित्यांचे सभापतींचा पद ग्रहण समारंभ प्रसंगी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पाणी पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्यास अरेरावीची भाषा वापरल्याने हा वाद नगरपरिषद कर्मचारी संघटनेने गंभीरपणे घेतला असून या प्रकरणी नगरपरिषेतील नगरसेवकांची अरेरावी थांबविण्यासाठी नगरपरिषदेचे काम बंद आंदोलन पुकारले होते. परंतु गुरुवार दि ११ फेब्रुवारी २०२१ रोजी नगराध्यक्ष यांच्या दालनात नगराध्यक्ष विजय वाहडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगरसेवक व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा उपस्थित बैठक घेतली. या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यां वतीने नगरसेवक यांनी माफी मागावी तेहवाच हे आंदोलन स्थगित करण्यात येईल अशी मागणी केली.
नगरसेवक विजय वाजे यांच्या वतीने जेष्ठ नगरसेवक रविंद्र पाठक यांनी दिलगिरी व्यक्त करत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली तर यावर नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी शिष्टाई करत हा विषय न वाढवता इथेच संपवा अशी विनंती अधिकारी वर्गाला करत येथून पुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही असे आश्वासन दिले असता कामगारांच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करत येथून पुढे असे प्रकार झाल्यास प्रशासनाच्या वतीने कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल आणि या वेळेपासून नगरपालिकेचे सर्व कामे सुरळीत पणे सुरू होईल असे बोलून आंदोलन संपल्याचे जाहीर केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत