14 महिने भाजपात माझा जीव गुदमरला..! गायकर यांची पिचडावर जोरदार टीका - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

14 महिने भाजपात माझा जीव गुदमरला..! गायकर यांची पिचडावर जोरदार टीका

अकोले : वेबटीम   पिचड यांनी तोफ डागल्यानंतर सीताराम पाटील गायकर यांनी पिचडांवर टिका करताना 1995 साली देखील बहुजन समाजावर प्रचंड अन्याय होत ह...

अकोले : वेबटीम 


 पिचड यांनी तोफ डागल्यानंतर सीताराम पाटील गायकर यांनी पिचडांवर टिका करताना 1995 साली देखील बहुजन समाजावर प्रचंड अन्याय होत होता. त्याची सल मनात धरुन माझ्यासह अनेकांनी पिचडांपासून काढता पाय घेतला होता. आज देखील तुलनात्मक परिस्थिती वेगळी नाही. आज पिचड व त्यांचे कार्यकर्ते माझ्यावर टिका करीत आहेत. मी जिकडे घुगर्‍या तिकडे उदोउदो असे म्हणत असेल तर पिचड पिता-पुत्र भाजपत काय द्राक्षांचा घड खायला गेले आहेत का? त्यांना देखील मंत्रीपदाची लालसा होती अशी टिका गायकरांनी पिचडांचे नाव न घेता केली. गेली 14 महिने त्या भाजपत जीव गुद्मरला होता, आता मात्र राष्ट्रवादीतच राहून मरायचे आहे असे विधान करीत त्यांनी स्वत:ला राष्ट्रवादी तथा पवार कुटुंबाला समर्पित केले आहे.

यावेळी गायकर यांनी महत्वाची गोष्ट स्पट केली की, आज जे कोणी राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांच्याकडून कोणावर अन्याय होणार नाही. ज्यांनी पक्षाला पडत्या काळात साथ दिली आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. ज्याच्याकडे मिरीट असेल तोच मोठा होईल, त्याला नक्की संधी मिळेल. येणारी नगरपंचायत, कारखाना, बाजार समिती अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात येणार आहेत. त्यासाठी आपल्याला ऐकोप्याने काम करावे लागणार आहे. यावेळी गायकर यांनी पिचडांचे नाव न घेता फार मोठे विधान केले की, आजही माझ्या मनात त्यांच्याविषयी सन्मान आहे. मात्र, त्यांनी त्याचा आदर करावा. माझ्या चौकशा लावा. मात्र, माझ्याकडे देखील त्यांची जंत्री आहे चुकीचे आरोप कराल तर मला देखील माहिती आहे की, कधी, केव्हा, कोठे कशी व कोणती चौकशी लावायची आहे. असे म्हणत गायकरांनी पिचडांना थेट जशास तशी सोज्वळ धमकीच दिल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे, हे राजकीय वातावरण आता कोठे जाऊन स्थिरावते आहे. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत