देवळाली प्रवरा : प्रतिनिधी राहुरी कारखान्याचे सभासद मोबाईल यंञणा हातळण्यात अनेक शेतकरी सक्षम नसताना व पाच वर्षाच्या अनागोंदी कारभावर कोणत...
देवळाली प्रवरा : प्रतिनिधी
राहुरी कारखान्याचे सभासद मोबाईल यंञणा हातळण्यात अनेक शेतकरी सक्षम नसताना व पाच वर्षाच्या अनागोंदी कारभावर कोणत्याही सभासदांनी बोलू नये म्हणून वार्षिक सभेची सभासदांना नोटीस व अहवाल दिलेला नाही. त्यामुळे डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाने ऑनलाईन आयोजित केलेली वार्षिक सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याची तक्रार राहुरी तालुका रामदास पा. धुमाळ विचार मंचचे अध्यक्ष अमृत धुमाळ यांनी प्रादेशिक सह संचालक (साखर) अ. नगर यांच्याकडे केली आहे.
या लेखी तक्रार अर्जात म्हटले आहे की, आम्ही या तक्रार अर्जावर सही करणारे सर्व डॉ.बा.बा.तनपुरे कारखान्याचे सभासद आहोत. तसेच प्रस्तुत अर्ज हा अर्जदार इतर सभासदांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात आपणाकडे सादर करण्यात येत आहे. डॉ.बा.बा.तनपुरे कारखान्याचे संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक ही सन २०१५ ते सन २०२१ या कालावधी करीता झालेली आहे. आज मितीस अस्तित्वात असलेल्या पदाधिकारी संचालकांच्या व त्यांच्या कार्यपध्दती बाबतच्या अनेक तक्रारी झालेल्या आहेत. त्या संबंधी वेळोवेळी काही सभासदांनी आवाज उठवलेला आहे. सदर कारखान्याचे पदाधिकारी व संचालक गंडळ फक्त आणि फक्त राजकारणापोटी कारखाण्याच्या सभासदांची दिशाभूल करत आहे . याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सन २८ मार्च रोजीची होवू घातलेली वार्षिक सर्वसाधरण सभा महाराष्ट्र सहकार कायदा १९६० व नियम १९६१ तसेच डॉ.बा.बा.तनपुरे कारखान्याचे नोंदणीकृत असलेले उपविधी यामध्ये वार्षिक सर्वसधारण सभा घेणे बाबतचा अर्ज शर्त कायदे नमूद आहेत. सर्व सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व वार्षिक अहवाल देणे गरजेचे आहे. ज्या वृत्तपत्राचे प्रचार व प्रसार चांगला असेल अशा वृत्तपत्रात या बाबत नोटीस देणे अभिप्रेत आहे. तसेच या कारखान्याचे सभासद हे २५ हजाराच्या वर असून फक्त मोजक्याच सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस दिल्या गेल्याचे समजते. या बंधनकारक गोष्टींना पूर्णपणे तडा सध्याच्या असणा-या पदाधिकारी संचालकांनी दिला आहे. या बाबत समजलेल्या माहिती नुसार सदरील होवू घातलेल्या सर्व साधारण सभेत काही विषयांवर ठराव पारित केल्याचे नियोजीत केल्याचे दिसते. ज्यामध्ये पदाधिकारी व संचालकांचे वैयक्तिक फायदा असेल व उलट पक्षी कारखाना व कायदेशिर सभासदांचे परिणामी नुकसान असेल. त्यामुळे प्रस्तुतचा सभासदांचा तक्रारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. यामध्ये कारखाना सभासद मालकीची असणारी कोटयावधी रुपयांची जमीन तसेच स्क्रॅप माल, भंगार विकला गेला याबाबत जाहिरात नाही. साखर आयुक्तांची परवानगी नाही. या भंगार व जमिन विक्रीच्या पैशांचा विनीयोग कशासाठी केला याचा तपशिल नाही. बँक खाते सदरील रकमा जमा नाहीत, वरील स्क्रॅप माल कुणाला विकला, कुठल्या एजन्सीला विकला याची सभासदांना माहिती नाही. तसेच भुसा, बगॅस व विम्याचे पैसे याचा हिशोब नाही. मॉलेसिस विक्रीचा हिशोब नाही. कर्ज खाती वेळेवर भरणा नाही. डिस्टलरी लायसेन्स विकण्यासाठी सभासदांची परवानगी नसताना संचालकांनी ठराव केला होता असे अनेक गैरप्रकार यामध्येमातून समोर आले आहेत. सभासद मालकीची असणारी कोटयावधी रुपयांची जमीन व इतर संस्था डिस्टलरी, कारखाना हे स्वत:च्या मालकीची करु शकता अशी भिती सभासदांमध्ये निर्माण केली आहे. त्यामुळे दि .२८.०३.२०२१ ची ऑनलाईन वार्षिक सभासाधारण सभा तात्काळ रद्द करण्याचे आदेश संबंधीतांना करावेत व योग्य ती कारवाई करावी. कारखान्याचे बहुसंख्य सभासद अशिक्षीत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरील ऑनलाईन समेचा निर्णय चूकीचा व दिशाभूल करणारा आहे. या तक्रार अर्जावर अमृत अण्णासाहेब धुमाळ यांच्यासह, पंढरीनाथ पवार, बाळासाहेब चव्हाण, ज्ञानदेव कोळसे, रविंद्र मोरे, सुभाष करपे, दत्तू पा जाधव, बाबाकाका देशमुख, अजित रामदास धुमाळ, बाळासाहेब खांदे, रामदास वने शिवाजी ढोकणे, रामभाऊ सोळुंके, खंडू ढोकणे, आप्पासाहेब कोहकडे, आप्पासाहेब माळवदे, सुरेशराव लांबे, अँड भाऊसाहेब पवार, बाबासाहेब धोंडे, गवजी पाटील आढाव आदींचे नावे आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत