राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यातील वडणेर येथील महिलेस शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध राहूरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह...
राहूरी(वेबटीम)
राहूरी तालुक्यातील वडणेर येथील महिलेस शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध राहूरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वडणेर येथील कमल सुखदेव गव्हाणे या आपल्या घरासमोर दि.२४ मार्च रोजी झाडलोट करत असताना शेजारी राहायला असणारे अशोक नामदेव गव्हाणे, महेश अशोक गव्हाणे व यमुना अशोक गव्हाणे यांनी घराबाहेर येऊन तू झाडून तुमच्या घरासमोरचा कचरा आमच्या जागेत का टाकला असे म्हणून फिर्यादी कमल गव्हाणे हिस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर कमल गव्हाणे यांनी वाऱ्याने उडून आला असेल, शिवीगाळ करू नका असे उत्तर देताच अशोक गव्हाणे, महेश गव्हाणे व यमुना गव्हाणे यांनी फिर्यादी कमळ गव्हाणे यांना खाली पडून लाथाबुक्क्याने मारहाण करून गँभीर जखमी केले.
दरम्यान कमल गव्हाणे यांनी राहूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत