वळणमध्ये साथीच्या आजाराने थैमान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वळणमध्ये साथीच्या आजाराने थैमान

  वळण (गोविंद फुणगे)  राहुरी तालुक्यातील पुर्व भागात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे.थंडी-ताप,उलट्या,पांढ-या पेशीसह डेंग्यू  आजाराचे रूग्ण ...

 वळण (गोविंद फुणगे)

 राहुरी तालुक्यातील पुर्व भागात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे.थंडी-ताप,उलट्या,पांढ-या पेशीसह डेंग्यू  आजाराचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहे.माञ आरोग्य विभाग अन्नभिन्न असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

  राहुरी तालुक्यातील वळण येथे लहान मुलांच्या साथीच्या आजाराने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे.थंडी-ताप ,उलट्या सह डेंग्यू भयानक आजाराने गावाने एंन्ट्री केली आहे.माञ दुसरीकडे शासनाच्या कोट्यावधी रूपये खर्चू करून सुसज्ज उभारण्यात आलेल्या इमारीत माञ हल्ली बहुतेक वेळा बंद असलेल्या स्थितीत आढळून येत आहे त्यामुळे हजारो नागरीकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असुन आरोग्य व्यवस्थाच सलाईनवर असल्याने समोर आलं आहे.येथे पुर्वी निवासी आरोग्य सेविका यांची नेमणूक होती.त्यांची याठिकाणाहून बदली झाल्याने आता ८  महिने उलटले असुन याठिकाणी निवासी आरोग्य सेविका नाहीत. त्यामुळे आरोग्य अधिकारी देखील येथे केवळ औपचारिकता हजेरी लावून वेळकाढुपणा काढण्यात धन्यता मानत आहेत.त्यामुळे वळण येथील आरोग्य उपकेंद्र ही फक्त शोभेची वास्तु बनलीय का ? असा सवाल सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.त्यामुळे येथे कायमस्वरूपी निवासी आरोग्य सेविकेची तातडीने नेमणुक करावी अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.

वळणसह मांजरी,मालुंजे आरोग्य सेविकांच्या प्रतिक्षेत;तनपुरेंनी लक्ष घालण्याची मागणी

राहुरी तालुक्यातील वळण,मांजरी,मालुंजे खुर्द येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या अनेक महिण्यापासुन निवासी आरोग्य सेवकांचे पद रीक्त आहे.त्यामुळे या परीसरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सर्वसामान्यांनामधुन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत