संधान व कोल्हे यांचे काय आर्थिक "संधान" आहे हे जनतेला माहिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संधान व कोल्हे यांचे काय आर्थिक "संधान" आहे हे जनतेला माहिती

  कोपरगाव(प्रतिनिधी)  कोपरगाव शहरात सध्या नगरपरिषदेच्या मंजूर -नामंजूर कामांबाबत वादविवाद- आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.कोल्हे गटाला बांधील असल...

 कोपरगाव(प्रतिनिधी)

 कोपरगाव शहरात सध्या नगरपरिषदेच्या मंजूर -नामंजूर कामांबाबत वादविवाद- आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.कोल्हे गटाला बांधील असलेले ७ ते ७ जण मिळून नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांना घेरून नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत.संजीवनी च्या आदेशावरून पोपट बोलतांना दिसतात.कोल्हे गटाकडे आर्थिक दहशत असली तरी नगराध्यक्ष वहाडणे यांच्यासोबत सुज्ञ जनता नक्कीच आहे.श्री.संधान साहेब २०१४ चा हिशोब अजूनही पुर्ण झाला नाही का? २०१४ गेले आता २०२१ सुरू आहे,पुरावे जाहिर करा.तुमची पात्रता जनतेने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दाखवून दिलेली आहे.वहाडणे तुमच्या सर्वांनाच पुरून उरलेले आहेत.येत्या निवडणुकीत जनता तुम्हालाच रस्त्याने चालणे मुश्किल करील हे लक्षात ठेवा.संधान व कोल्हे यांचे काय आर्थिक "संधान" आहे हे जनतेला माहिती आहे.

   चार वर्षे आम्हीच कामे मंजूर केली म्हणून कामे झाली अशी मखलाशी करणाऱ्या कोल्हे भाजपाने  प्रभागातील कामे करून घेण्यासाठी एम जे पी  ची तांत्रिक मान्यता मान्य केली.पण आता शहरातील मोक्याचे रस्ते झाले तर नगरपरिषद निवडणुकीत आपल्याला अडचणीचे होईल असे वाटल्याने नामंजुरीचे किळसवाणे डावपेच सुरू झाले.वहाडणे यांच्यावर टिका केली, विरोध केला तरच संजीवनी कृपेने टेंडर मिळतात,गाड्या भाडोत्री लावता येतात,अतिक्रमण सुरक्षित रहाते,पदांचे तुकडे चघळायला मिळतात.विजयराव वहाडणे एकटेच पत्रकार परिषद घेतात.त्यांच्याविरुद्ध मात्र जनतेने नाकारलेले- अतिक्रमण करणारे- दोन नंबरकडून वर्षानुवर्षे हप्ते घेणारे -ठेकेदाराला लुटणारे,संस्था खाणारे-ठेकेदाराचे पार्टनर एकवटले आहेत.वहाडणे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला हे मान्य आहे.पण मोदी लाट व कोट्यावधी रुपये असूनही तुमच्या नेत्या का पराभूत झाल्या याचे उत्तर द्या?

वाळूचे ठेके चालविणारे नेते कोण? याबाबत बोलायची हिंमत दाखवा.वाळूचे लाभार्थीं जमवून राजकारण करणाऱ्या कोल्हे गटाला येणाऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकविणारच यात शंकाच नाही.महत्वाचे रस्ते,खुले नाट्यगृह इ. कामे रोखणाऱ्याना जनता जागा दाखविणारच.

श्री.वहाडणे यांनी दिल्ली येथे जाऊन ना.नितीनजी गडकरी यांना सांगून "गायत्री" कंपनीला 5 नं. साठवण तलावाचे खोदकाम करायला सांगितले,त्याप्रमाणे कामही सुरू झाले.पण तुम्हीच अडथळे आणल्याने काम थांबले.त्यानंतर आ.आशुतोषजी काळे व आम्ही  प्रयत्न केल्याने पुन्हा काम सुरू झाले.ते काम पूर्णत्वास जाईलच, फक्त कोल्हे गट आडवा यायला नको.श्री संजयजी सातभाईंना नजरेत भरेल असा,अनेक वर्षे कोपरगावसाठी उपयुक्त ठरणारा सिमेंट काँक्रीटचा साठवण तलाव होणार आहे,पण चांगल्या कामाला नेहमीप्रमाणे तुम्ही अडथळे आणायला नको.

खरे तर कोल्हे गटाचे "उद्योग" जाहीर करा असे आम्ही याआधीच सांगितले होते.पण नगराध्यक्षाना अपेक्षा होती कि त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होईल,पण केवळ आदेशावर चालणाऱ्या कोल्हे गटाने तसे न केल्याने नगराध्यक्षांनी उशिरा का होईना त्यांना उघडे पाडल्याने ते चवताळून आरोप करत आहेत.

नगराध्यक्ष विजय वहाडणे लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेतच अशी माहिती नरेंद्र मोदी विचार मंच कोपरगावचे वसंत जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत