राहूरी प्रतिनिधी पुणे शहरातील खडक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांना निलंबीत ...
राहूरी प्रतिनिधी
पुणे शहरातील खडक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांना निलंबीत करावे. या मागणीसाठी राहुरी येथील डॉ. विजय मकासरे यांनी पुणे शहरातील लाचलुचपत विभागाचे पोलिस आयुक्त यांच्याकडे दि. १ मार्च रोजी अर्ज केला आहे.
डाॅ. विजय अण्णासाहेब मकासरे राहणार वळण, ता. राहुरी. जि. अहमदनगर. यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे कि, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे सध्या खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर. येथे कार्यरत असुन यापुर्वी ते श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणुन कार्यरत होते. त्यावेळी त्यांची कारकिर्द अतिशय वादग्रस्त ठरली होती. त्यावेळी त्यांनी लाखो रुपयांचा गुटखा व पान मसाला पकडला होता. त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड केली असल्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी लोकांवर खोटे गुन्हे दाखल करुन मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आहे. त्यांच्या पोलीस स्टेशन हददीत मोठ्या प्रमाणात मटका व झुगार सुरु होता. त्यावेळी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हददीत छापे घालुन कारवाई केली होती. त्यानंतर कारवाईचा भाग म्हणुन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांची अहमदनगर पोलीस मुख्यालयात बदली केली होती. परंतु वशिल्याच्या जोरावर त्यांनी त्यांची बदली पुणे शहर विभागात करुन घेतली. सध्या ते खडक पोलीस स्टेशन पुणे शहर. येथे कार्यरत असुन या ठिकाणीही ते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी त्यांच्या संपुर्ण संपत्तीची. स्थावर मालमत्तेची चौकशी करावी. अशी विनंती डाॅ. विजय मकासरे यांनी अर्जाद्वारे केली आहे.
यामुळे आता या घटनेची अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील पोलिस वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत