राहूरी(वेबटीम) राहूरी येथील सरकारी दवाखाना येथे आज दिनांक ३ मार्च रोजी ज्येष्ठ नागरिक व तालुक्यातील खासगी डॉक्टरांना मोफत कोविड-१९ लसीकरण द...
राहूरी(वेबटीम)
राहूरी येथील सरकारी दवाखाना येथे आज दिनांक ३ मार्च रोजी ज्येष्ठ नागरिक व तालुक्यातील खासगी डॉक्टरांना मोफत कोविड-१९ लसीकरण देण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोना आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात असताना राहूरी येथे सरकारी दवाखान्यात आज दिनांक ३ मार्च रोजी ६० वर्षावरील नागरिकांना तसेच ज्यांना ब्लडप्रेशर, शुगर, दमा व इतर आजार आहेत अशा ४५ वयापुढील व्यक्तींना कोविड -१९ लसीकरण देण्यास प्रारंभ केला आहे. लसीकणाला येताना आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक यापैकी एक ओळखपत्र घेऊन यावे तसेच राहुरी तालुक्यातील खासगी डॉक्टरांना जागेवर नोंदणी करून लसीकरण देण्यात येणार असून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन राहूरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपाली गायकवाड यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत