वळण येथे डेंग्यू रूग्ण सापडल्याच्या वृत्तानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वळण येथे डेंग्यू रूग्ण सापडल्याच्या वृत्तानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे

वळण(गोविंद फुणगे) राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण येथे साथीचे आजारासह डेंग्यू सारख्या भयानक आजाराचा  रुग्ण आढळल्याचे वृत्त सर्वप्रथम ...

वळण(गोविंद फुणगे)

राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण येथे साथीचे आजारासह डेंग्यू सारख्या भयानक आजाराचा  रुग्ण आढळल्याचे वृत्त सर्वप्रथम 'आवाज जनतेचा' वेबपोर्टलवर सर्वप्रथम प्रसिद्ध होताच आरोग्य विभाग खडबडून जाग झाले असून आज सकाळीच गावात तालुका आरोग्य अधिका-यांची टिम दाखल झाली असुन संपुर्ण गावात घरोघरी जावून सर्व्हेक्षण सुरू करण्यात आहे.

  वळण(ता.राहुरी )राहुरी येथे साथीच्या आजारासह डेंग्यू रूग्ण आढळला होता.तर येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या अनेक महिण्यापासून निवासी आरोग्य सेविका नाहीत तर तर आरोग्य उपकेंद्र हे देखील बहुतेक वेळा बंद असल्याचे वृत्त झळकताच तालुका आरोग्य अधिकारी दिपाली गायकवाड यांनी तात्काळ दखल घेत वळण गावात पर्यवेक्षक कगदी एम.जी,कसबे जी.आर,शेजवळ,शेख अंजुम,खाडे जी.आर.,ओहळ चंद्रकांत सह ग्रामसेवक संतोष राठोड,उपसरपंच एकनाथ खुळे, अशोक कुलट यांच्या टिमने गावातील ठिकठिकाणी गृहभेटी देत सर्वक्षण सुरू केल आहे. तसेच आरोग्य सेविका बाबत वरीष्ठाकडे अहवाल पाठवला असून येथील आरोग्य उपकेंद्र कायम सुरू राहील असे देखील  सांगण्यात आले आहे.तसेच ग्रामपंचायतीला सार्वजनिक स्वच्छता तसेच निर्जुतुकिकरण धुर फवारणी करण्याच्या सुचना देखील यावेळी  करण्यात आल्या आहेत. 'आवाज जनतेचा' पोर्टलची आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेतल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत