राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत प्रणाली आहेर जिल्ह्यातून विजयी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत प्रणाली आहेर जिल्ह्यातून विजयी

  कोपरगाव प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातून राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील प्रणाली अर्जुन आहेर ही विजेती ठरली आह...

 कोपरगाव प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातून राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील प्रणाली अर्जुन आहेर ही विजेती ठरली आहे.

 नई रोशनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था औरंगाबाद व व्हर्सटाइल महाराष्ट्र यु-ट्यूब चॅनेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यस्तरीय खुल्या ऑनलाइन स्पर्धा संयोजक रसूल बकश शेख यांच्या संकल्पेनेतून दि ८ फेब्रुवारी ते दि ८ मार्च २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातून २०० हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता यात कोपरगाव तालुक्यातील ग्रामिण भागातील  मंजूर या गावातील  इ १२ वी मध्ये शिकणारी कु प्रणाली अर्जुन आहेर या तरुणीने भाग घेत "माझ्या बाबांचा मान" या कवितेचे ऑनलाईन सादरीकरण करत  अहमदनगर जिल्ह्यातुन एकमेव विजेती ठरली असून तिला संस्थेचे प्रमाणपत्र व रोख स्वरूपात बक्षीस मिळाले आहे.

  या आधी प्रणालीने स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात मेरिट मध्ये येऊन आपल्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देखील मिळवली आहे तर विज्ञान स्पर्धेत  जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे तर आज पर्यंत तिने श्री गणेश  टॅलेंट सर्च, संजीवनी टॅलेंट सर्च, ओम गुरुदेव आत्मा मालिक शिष्यवृत्ती स्पर्धेत भाग घेऊन नाविन्यपूर्ण यश मिळवले असून तिचा या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत