प्राथमिक शिक्षक बँकेच्या घोटाळ्यांच्या मालिकेत आता शौचालय घोटाळा* - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्राथमिक शिक्षक बँकेच्या घोटाळ्यांच्या मालिकेत आता शौचालय घोटाळा*

अहमदनगर : वेबटीम      जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक आता आशिया खंडात घोटाळ्यांची बॅंक म्हणूण नावारूपाला येत आहे करोना संसर्ग कालावधीमध्य...


अहमदनगर : वेबटीम   




 जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक आता आशिया खंडात घोटाळ्यांची बॅंक म्हणूण नावारूपाला येत आहे करोना संसर्ग कालावधीमध्ये मुदतवाढ मिळाल्यामुळे विदयमान सत्ताधारी संचालकांनी संधीचे सोने करुण घेण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत. घडयाळ खरेदी घोटाळा, घडयाळ वाटप घोटाळा, कर्मचारी फरक घोटाळा, सावित्रीच्या लेकी पुरस्कार घोटाळा, पाथर्डी शाखा दुरुस्ती घोटाळा आता नव्याने शौचालय घोटाळा पुढे आला आहे.      

बँकेच्या मुख्य कार्यालयात असलेल्या शौचालयासाठी दुरुस्तीसाठी  गेले वर्षभरापूर्वी साहेबराव अनाप चेअरमन असताना तब्बल ९० हजार रुपये एवढे  खर्च करण्यात आले होते. वर्षभरानंतर पुन्हा आता राजू राहाणे चेअरमन असताना पुन्हा नव्याने लाखभर रुपये  त्याच शौचालयाची दुरुस्ती करण्यासाठी वापरली जाणार आहे. एका शौचालयासाठी अवघ्या वर्षभरात एकूण जवळजवळ २ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. करोना संसर्गामुळे मिळालेल्या मुदतवाढीचे सोने करण्याचा सपाटा संचालक मंडळाने लावलेला आहे. त्या नादात कशात खावे याचे भान सत्ताधाऱ्यांना राहीलेले नाही तीच तीच कामे काढूण पैसे कमावण्याचा गोरखधंदा सध्या शिक्षक बँकेत जोरात चालू आहे. मुदत संपलेली असताना नव्याने कोणती कामे करता येणार नाहीत म्हणूण पुन्हा पुन्हा तीच तीच कामे काढूण भ्रष्टाचार सत्ताधारी संचालक मंडळाने सुरु केलेला आहे असा आरोप नगर तालुका शिक्षक परिषद अध्यक्ष संजय दळवी व गुरुमाऊलीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाबळे यांनी केला. 

एकाच  कामासाठी दोनदा खर्च. 

शौचालयाच्या लाभार्थीने बॅंकेच्या मुख्यालयातून कर्मचाऱ्यांचे घामाचे व कष्टाचे ४० लाख रुपये पिशवी भरुन नेले आहेत ह्याचाही खुलासा लवकरच करण्यात येणार आहे. शौचालयाच्या लाभार्थी आणि त्याला पिशव्या भरायला लावणारा मास्टरमाईंड नेता हे आपणाला आता राज्यबँक करण्याचे दिवास्वप्न दाखवत आहेत केवळ भ्रष्टाचारावरूण सभासदांचे लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न आहे.परंतू जिल्ह्यातील सभासद त्यांचे कोणतेच इरादे यशस्वी होऊ देणार नाहीत-          

           बाबा धरम

पारनेर तालुकाध्यक्ष रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत