कोपरगाव(अक्षय काळे) शहरातील गांधीनगर परिसरात घर मालकाचा विश्वास संपादन करून जवळपास ११ सोने चोरी करून पसार झालेल्या नवरा- बायकोचा शोध कोपरग...
कोपरगाव(अक्षय काळे)
शहरातील गांधीनगर परिसरात घर मालकाचा विश्वास संपादन करून जवळपास ११ सोने चोरी करून पसार झालेल्या नवरा- बायकोचा शोध कोपरगाव शहर पोलिसांनी लावून दोघांना अटक केले आहे.
कोपरगाव शहरातील गांधीनगर येथे गेल्या ३ वर्षांपूर्वी महेश नारायण कडलग यांच्या घरातील खोली भाडोत्री घेऊन घरमालकाचा विश्वास संपादन करून जवळपास साडे अकरा तोळे सोने घेऊन पसार केल्याची घटना घडली होती. याबाबत ग कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोने चोरी प्रकरणातील आरोपिंचा तपास पोलिसांना लागला नव्हता.
कोपरगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तपासाची चक्रे फिरवीत स्मिता उर्फ प्रिती उर्फ प्रिया नवनीत नाईक (वय 36) व तिचा नवरा नवनीत मधुकर नाईक (वय 41राहणार शिवाजी नगर भांडुप पश्चिम मुंबई) या दांपत्याना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिस अधिक्षक मनोज पाटील अप्पर पोलिस अधिक्षक श्रीरामपूर डॉ दिलापी काळे, उपविभागीय पोलिस उपअधीक्षक संजय सातव पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे, पोलिस कॉन्स्टेबल मनोज काटे ,गणेश थोरात ,महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रिती बनकर होमगार्ड अमोल दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.,
* दोघेही कोरोना बाधीत*
सोने चोरी प्रकरणातील आरोपी दाम्पत्य यांना न्यायालयासमोर हजर केले असता ७ दिवसांची पोलिस सुनावण्यात आली. परंतु सदर आरोपी दाम्पत्य यांना कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात येऊन कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
*पो.नि देसले यांच्या कामगिरीबद्दल समाधान*
शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आक्रमक भूमिका घेत असून अनेक गुन्ह्यांची उकल करून आरोपींना ताब्यात घेण्यात त्यांना यश मिळत आहे. गेल्या २ दिवसापूर्वी बेपत्ता बहिणींचा अवघ्या काही तासात शोध पो.नि देसले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने घेतला असता आज जुन्या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतल्याने देसले यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत