आंबी(संदीप पाळंदे) राहुरी तालुक्यातील गंगापूर येथे पंचायत समितीचा पथदर्शी उपक्रम असलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अ...
आंबी(संदीप पाळंदे)
राहुरी तालुक्यातील गंगापूर येथे पंचायत समितीचा पथदर्शी उपक्रम असलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत गंगापूर व परिसरातील तेरा बचत गटांनी एकत्र येऊन प्रगती महिला ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली.
या ग्रामसंघाच्या कार्यालायाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे प्रकल्प अधिकारी तागड साहेब, बँक ऑफ बडोदा गुहा शाखेचे देशपांडे साहेब, समनव्य अधिकारी प्रजापती मॅडम, गायकवाड साहेब, चिंचोलीचे सरपंच गणेश हारदे, अंमळनेरचे माजी सरपंच रोहण जाधव, गंगापूर सोसायटीचे चेअरमन संभाजी नांनोर, बाळासाहेब कोळसे, आंबीचे उपसरपंच विजय डुकरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगापूरचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिष खांडके हे होते.
याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. बचत गटाच्या सी.आर.पी सुषमा भुजबळ यांनी बचत गटांमार्फत राबविण्यात आलेल्या कामाची रूपरेषा मांडली. याकामी सरपंच सतिष खांडके यांनी केलेल्या सहकार्याचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी पिंपळगाव फूणगीच्या रुपाली झगडे, रुकसाना शेख, मीना खेमनर, सविता भुजबळ, माजी सरपंच अर्चना भुजबळ, प्रिया काळे आदी महिलांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र कोळेकर यांनी केले. याप्रसंगी ग्रामसंघाच्या कार्यालयासाठी नाथाभाऊ शिंदे यांनी निशुल्क जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
"ग्रामीण भागातील महिलांना एकत्रित आणण्याचे काम बचत गट करीत आहे. प्रगती महिला ग्रामसंघ गावच्या विकासातील केंद्रबिंदू ठरेल यात तिळमात्र शंका नाही. गंगापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसंघाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल."
- सतिष खांडके (लोकनियुक्त सरपंच गंगापूर)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत