कोल्हेंच्या विरोधात बोलण्याची तुमची धमक आहे का? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोल्हेंच्या विरोधात बोलण्याची तुमची धमक आहे का?

  कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यात व  राज्यात भाजपाचीच सत्ता असतांना विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी काहीच न करणाऱ्या माजी आमदार सौ.स्नेहलत...

 कोपरगाव प्रतिनिधी


कोपरगाव तालुक्यात व  राज्यात भाजपाचीच सत्ता असतांना विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी काहीच न करणाऱ्या माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांच्याविरुद्ध एक तरी शब्द बोलायची हिंमत आहे का? अशी जहरी टिका  माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालना बाहेर खुर्च्यांना हार घालून गांधीगिरी करणाऱ्या वर केली आहे.


बुधवार दि १० मार्च रोजी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हे शहराच्या हिताचेच कामासाठी जिल्हाधिकारी साहेबांनीच दिलेल्या तारखेला अहमदनगर येथे गेले होते.१० वर्षांपासून विस्थापितांना न्याय मिळालेला नाही.अनेकजण विस्थापितांच्या प्रश्नावर केवळ प्रसिद्धीसाठी गांधीगिरीचे उद्योग करत आहेत. खरे तर नगराध्यक्ष विजय वहाडणे हे गेल्याच महिन्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून आले."फक्त नगरपरिषदेच्या नावावर असलेल्या जागेवरच खोका शॉप करता येतील" असे उत्तर शासनाने दिलेले आहे.हे माहित असूनही काहीजण आपल्यालाच विस्थापितांची फार काळजी आहे असे दाखवित असतात.माजी आमदार कोल्हे यांच्या कार्यालयात जाऊन रिकाम्या खुर्चीला हार घालण्याची धमक तुमच्यात आहे का?तुमच्यातील काहीजण तर कोल्हे यांच्या सतत संपर्कात असतात.विस्थापितांना फक्त नादी लावण्याचे काम वर्षानुवर्षे झाले.पण नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी मात्र शासनाकडे जाऊन सर्वांसमोर वस्तुस्थिती लक्षात आणून दिली.नगरपरिषदेने ८ ठिकाणच्या जागा शासनास सुचविल्या,पण शासन त्याठिकाणी खोका शॉपसाठी परवानगी देत नाही. केवळ बाजारतळ येथेच खोका शॉप होतील.काँग्रेस कमिटीजवळ खोका शॉपचा प्रस्ताव आहे.तेथेही काहीजण आडवे येताहेत.तरीही नगरपरिषदेचे प्रयत्न सुरू आहेत.कृपयाकुणीही विस्थापितांच्या भावनांशी खेळू नये.किमान ज्यांना कायदे-नियम माहित शांनी तरी भान ठेवावे. बातम्या-फोटो-मेसेजमुळे आपण लोकप्रिय होऊ हा गैरसमज काढून टाका.लोकशाहीमध्ये प्रत्येकास आंदोलन करण्याचा, टिका करण्याचा अधिकार आहे.पण काही भोळ्या विस्थापितांना सोबत घेऊन,आशेला लावून वेड्यात काढू नये. फक्त येणारी नगरपरिषद निवडणुक डोळ्यासमोर ठेवून आंदोलने करू नका.हिंमत असेल तर बड्या नेत्यांविरुद्ध बोलून दाखवा.



तांत्रिक पुर्तता होऊन बाजारतळ येथे खोका शॉप होणारच आहेत.पण ते आमच्या मुळेच होताहेत असा आव कुणीही आणू नये अशी माहिती माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत