देवळाली प्रवरा नगरपालिका उपनगराध्यक्ष निवड तारीख जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपालिका उपनगराध्यक्ष निवड तारीख जाहीर

देवळाली प्रवरा (वेबटीम)    देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी दोन महिण्यानंतर अखेर मुहुर्त मिळाला असून १६  मार्च रोजी दुपार...

देवळाली प्रवरा (वेबटीम)

   देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी दोन महिण्यानंतर अखेर मुहुर्त मिळाला असून १६  मार्च रोजी दुपारी 3 वा. व्हिडीओ काँन्फरन्सींगव्दारे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपात दाखल झालेले जेष्ठ नगरसेवक आण्णासाहेब चोथे यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे समजते.

 जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशा नुसार देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या रिक्त जागेची निवडप्रक्रिया जाहिर करण्यात आली आहे. प्रकाश संसारे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा १८ जानेवारी रोजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यांकडे राजीनामा दिला होता.नगराध्यक्ष कदम यांनी २५  जानेवारी रोजी राजीनामा मंजुर केला. मंजुर राजीनामा मुख्याधिकारी अजित निकत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून रिक्त उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्यासाठी पञव्यवहार केला. परंतू  दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर उपनगराध्यक्ष निवडीला मुहुर्त मिळाला आहे. मंगळवार १६ मार्च रोजी उपनगराध्यक्ष निवड होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष निवड प्रक्रिया व्हिडीओ काँन्फरन्सींगद्वारे पार पाडण्याचे आदेशात नमुद केले आहे. 

                    उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून मंगळवार १६  मार्च रोजी सकाळी ११ ते १ वाजे पर्यंत मुख्याधिकारी  यांच्याकडे नामनिर्देशन पञ दाखल करावयाचे आहे.दुपारी ३ वा व्हिडीओ काँन्फरन्सींगद्वारे सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.सभा सुरु झाल्या नंतर ३ ते ३.३० या कालावधीत नामनिर्देशन पञांची छाननी करण्यात येणार आहे.उपनगराध्यक्ष पदासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आले तर ३.३५ते ३.५० यावेळेत माघार घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.त्यानंतर उपनगराध्यक्ष निवड जाहिर करण्यात येणार आहे. सदर सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून श्रीरामपूचे प्रांताधिकारी हे जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

              उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी सव्वाचार वर्ष उपनगराध्यक्षपद सांभाळले अवघ्या सात महिण्यावर नगरपालिकेची सार्वञिक निवडणूक येवून ठेपली आहे. अवघ्या सात महिन्याकरीता उपनगराध्यक्ष निवड करण्यात येत आहे.२०१६ मध्ये झालेल्या नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केलेले जेष्ठ नगरसेवक आण्णासाहेब चोथे यांची उपनगराध्यक्ष पदी वर्णी लावण्यात येणार असल्याचे भाजपाच्या गोटातून समजते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत