विस्तापित टपरी धारकांच्या प्रश्नासाठी गांधीगिरी आंदोलन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विस्तापित टपरी धारकांच्या प्रश्नासाठी गांधीगिरी आंदोलन

कोपरगाव वेबटीम कोपरगाव शहरातील विविध रस्ते व शासकीय जागेवर असलेली अतिक्रमण काढून दहा वर्षे झाली मात्र या विस्तापित टपरी धारकांचा प्रश्न अध्य...

कोपरगाव वेबटीम

कोपरगाव शहरातील विविध रस्ते व शासकीय जागेवर असलेली अतिक्रमण काढून दहा वर्षे झाली मात्र या विस्तापित टपरी धारकांचा प्रश्न अध्याप सुटला नाही त्यामुळे आज नगर पालिकेत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

10 मार्च 2011 रोजी कोपरगाव शहरातील रस्ते व शासकीय जागेवर असलेली अतिक्रमणे काढून टाकण्यात आली त्यास आज 10 वर्ष पूर्ण झाले आहे. प्रत्येक निवडणुका जवळ आल्या की अतिक्रमण धारकांचा प्रश्न ऐरणीवर येतो विस्तापित टपरी धारकांच्या पुनर्वसनाची अस्वासने दिली जातात मात्र दुर्दैवाने दहा वर्षे झाली तरी ही विस्थापितांना न्याय मिळालेला नाही,म्हणून आज कोपरगाव व्यापारी समिती व विस्थापित टपरी धारकांनी  तसेच विविध सामाजिक संघटनांनी उजव्या हाताच्या दंडाला काळ्या रंगाच्या फीती बांधून ,काळा दिवस पाळला आहे ,व गांधीगीरी मार्गाने कोपरगाव नगरपरिषद चे नगराध्यक्ष साहेब , मुख्याधिकारी साहेब यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी गेले असता कोणीच उपस्थित नसल्याने त्यांच्या दालनाच्या बाहेर खुर्ची ला हार व गुलाबाचे फूल अर्पण करून खोका शॉपचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून साकडे घातले आहे.

या वेळी विस्तापित टपरी धारक बालाजी गोर्डे,अजय विघे,सुनील गायकवाड व्यापारी समितीचे अकबर शेख,निसार शेख ,शरद त्रिभुवन शरद खरात,लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ, नरोडे आदीनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला पुष्पहार व गुलाब अर्पण केले.

 विस्तापित टपरी धारकांच्या प्रश्नावर विविध सामाजिक संघटना तसेच कोपरगाव व्यापारी समिती सतत पाठपुरावा करित आहे ,वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहे,सुमारे १२०० पेक्षा जास्त टपरी धारक या अतिक्रमण मोहिमेत विस्तापित झाले होते. 


विविध संघटना वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रश्न हाताळत असून या पूर्वी नगराध्यक्ष मा विजय वहाडणे व मुख्याधिकारी यांनी बाजार तळावर काही खोका शॉप ला परवानगी देण्याचे आश्वासन दिले आहे त्याच प्रमाणे मागील महिन्यात नगर येथे नगर रचना विभागाच्या बैठकीत नगर पालिकेने योग्य नियोजन करून रस्त्याला अडथळा होणार नाही असे पाहून विस्तापित टपरी धारकांचा प्रश्न सोडवावा असे सांगितले असून नगर पालिकेच्या जागेवर परवानगी देऊन हा प्रश्न सोडवता येईल मात्र तालुक्याचे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी  नगर पालिका निवडणुकीपूर्वी हा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत