आजच्या काळात सर्वच मैदानी क्रिडा स्पर्धा खेळणे गरजेचे - विवेक कोल्हे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आजच्या काळात सर्वच मैदानी क्रिडा स्पर्धा खेळणे गरजेचे - विवेक कोल्हे

कोपरगाव(वेबटीम) - आजच्या काळात तरुण वर्ग हा डिप्रेशन, व्यसनाधीनता यात अडकून आत्महत्या व चुकीचा मार्ग निवडण्याच्या अनेक घटना घडतात त्यावर उपा...

कोपरगाव(वेबटीम)

- आजच्या काळात तरुण वर्ग हा डिप्रेशन, व्यसनाधीनता यात अडकून आत्महत्या व चुकीचा मार्ग निवडण्याच्या अनेक घटना घडतात त्यावर उपाय म्हणून आयुष्यात खिलाडूवृत्ती जोपासली जाण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या आहेत. मैदानी क्रिडा स्पर्धा या आजच्या काळात महत्वाच्या असून मोबाईल मध्ये व्यस्त राहण्याऐवजी क्रिकेट सह अन्यही सर्वच मैदानी क्रिडा स्पर्धा खेळणे गरजेचे असल्याचे मत कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सह बँकेचे संचालक,युवानेते श्री.विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केले.

कोपरगाव शहरातील वानखेडे स्टेडियमच्या नावानी ओळखल्या जाणाऱ्या के बी पी शाळेच्या मैदानावर युवा नेते विवेक भैय्या कोल्हे चषकाचे आयोजन टिळक चौक मित्र मंडळाचे वतीने करण्यात आले आहे या चषकाचे उदघाटन प्रसंगी विवेक कोल्हे बोलत होते. 

याप्रसंगी आयोजित केलेल्या चषकाची माहिती देतांना टिळक चौक मिञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक लकारे म्हणाले की, सर्व खेळांमध्ये क्रिकेट हा भारत देशात खेळला जाणारा सर्वात प्रमुख खेळ आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये क्रिकेट हा खेळ लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांचा आवडता खेळ बनला आहे.मात्र सध्या युवक मैदानी खेळापासून दूर झालेले दिसत आहे नवीन पीढ़ी ही मैदानी खेळा पासून दूर जावू नये या उद्देशाने चषकाचे आयोजन केले असल्याचे लकारे म्हणाले. याप्रसंगी टिळक चौक मिञ मंडळाचे वतीने विवेक कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. 

 याप्रसंगी विवेक कोल्हे बोलतांना म्हणाले की, मी ही महाविद्यालयीन काळात खेळाडू होतो अनेक मैदानी स्पर्धा गाजवल्या आहेत त्यामुळेच राजकीय,सामाजिक क्षेत्रात काम करतांना व मैदान गाजवायला खिलाडुवृत्तीचा मला फायदा झाला आहे असल्याचे विवेकभैय्या कोल्हे म्हणाले. 


यावेळी टिळक चौक मिञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक लकारे, राजेंद्र गंगुले, अविनाश पाठक, प्रा.डॉ.सुनिल कुटे, वाल्मिक लहिरे, देविदास कानडे, नरेंद्र लकारे, फकिर महंमद पहिलवान, खालीकभाई कुरेशी, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, वासुदेव शिंदे, सचिन लकारे, जगदीश लकारे, रविंद्र लकारे, विशाल लाकारे, प्रा.आकाश लकारे, हर्षल लचुरे, राहुल लचुरे, दादा पाटिल मुसमाडे, सिद्धेश लकारे, जीतू पंजाबी, कुणाल गंगुले, शमित माळी, रोहण लकारे, कन्हैय्या गंगुले, सुनिल कुटे, राजेंद्र मेहेरे, ओकांर जाधव, स्वराज लकारे, कुणाल लकारे, ईश्वर लकारे, विशाल लकारे, सागर ढोणे, भाऊ आढाव, सागर पंडोरे, मनोज नरोडे, श्रीकांत लकारे आदिंसह मान्यवर व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत