देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी चोथेंची औपचारीक घोषणा बाकी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी चोथेंची औपचारीक घोषणा बाकी

  देवळाली प्रवरा (प्रतिनिधी )     देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवड मंगळवार 16 मार्च रोजी दुपारी 3 वा. व्हिडीओ काँन्फरन्सींगव्द...

 देवळाली प्रवरा (प्रतिनिधी )

  

 देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवड मंगळवार 16 मार्च रोजी दुपारी 3 वा. व्हिडीओ काँन्फरन्सींगव्दारे होणार आसून त्या निमित्त सोमवारी सकाळी 11 वा. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी बैठक बोलावून उपनगराध्यक्ष पदासाठी जेष्ठ नगरसेवक आण्णासाहेब चोथे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यावरुन उपनगराध्यक्ष चोथे यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे निश्चित केले आहे.फक्त पिठासिन अधिकारी यांच्या घोषणेची औपचारीकता बाकी राहिली आहे.  


   जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशा नुसार देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या रिक्त जागेची निवडप्रक्रिया जाहिर करण्यात आली आहे. प्रकाश संसारे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा 18 जानेवारी रोजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यांकडे राजीनामा दिला होता.नगराध्यक्ष कदम यांनी 25 जानेवारी रोजी राजीनामा मंजुर केला. मंजुर राजीनामा मुख्याधिकारी अजित निकत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून रिक्त उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्यासाठी पञव्यवहार केला.  मंगळवार 16 मार्च रोजी उपनगराध्यक्ष निवड करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष निवड प्रक्रिया व्हिडीओ काँन्फरन्सींगद्वारे पार पाडण्याचे आदेशात नमुद केले आहे. माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी बागायतपिक सोसायटी मध्ये गटनेते, नगरसेवकांची बैठक घेवून उपनगराध्यक्षपद चोथे यांना देण्याचे ठरविले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही अर्ज दाखल करावयाचा नाही. 

            मंगळवार 16 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 वाजे पर्यंत मुख्याधिकारी  यांच्याकडे नामनिर्देशन पञ दाखल करावयाचे आहे.दुपारी 3 वा व्हिडीओ काँन्फरन्सींगद्वारे सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.सभा सुरु झाल्या नंतर 3 ते 3;30 या कालावधीत नामनिर्देशन पञांची छाननी करण्यात येणार आहे.उपनगराध्यक्ष पदासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आले तर 3;35 ते 3;50 यावेळेत माघार घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.त्यानंतर उपनगराध्यक्ष निवड जाहिर करण्यात येणार आहे. परंतू  उपनगराध्यक्ष पदासाठी आण्णासाहेब चोथे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने चोथे यांची उपनगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे.फक्त औपचारीक घोषणा बाकी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत