कोपरगावात चोरीच्या घटना थांबता थांबेना... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात चोरीच्या घटना थांबता थांबेना...

  कोपरगाव(वेबटीम)  कोपरगाव शहरात दुकाने फोडण्याचे सत्र सुरूच असल्याने शहरातील दुकानदार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.वाढत्या चोऱ्यांना आळा...

 कोपरगाव(वेबटीम)

 कोपरगाव शहरात दुकाने फोडण्याचे सत्र सुरूच असल्याने शहरातील दुकानदार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.वाढत्या चोऱ्यांना आळा बसणार कधी? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.

 कोपरगाव शहरातील अवैध धंदे, चोऱ्या, हाणामाऱ्या आदी घटना नित्याच्या बनल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल लंपास करण्याच्या घटना सातत्याने सुरू आहे. चार दिवसांपूर्वी घरफोडी करणारा आरोपी मोठ्या शिताफीने पकडण्यात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला यश आले. आरोपी पकडल्यानंतर कोपरगाव पोलिसांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. दुकानदार मंडळी जाम खुश झाले. पोलिसांची कॉलर ताईट झाली. मात्र आज पुन्हा एकदा चोरट्यांना आव्हान दिले असून पुणतांबा चौफुली येथे देशी दारूचे दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 शहरातील दुकान फोडीच्या घटना सातत्याने सुरू असल्याने व्यापारी वर्गात भीती पसरली आहे. शहरातील संपूर्ण भागात रात्रीची गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 दरम्यान कोपरगाव शहरात अवैध व्यवसाय ही जोमात सुरू असून पोलिसांच्या 'अर्थ' पूर्ण संबंधामुळे मटका, जुगार, अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैध व्यवसाय करणारे मंडळीवर पोलिसांचे कृपादृष्टी असल्याने आमचे काहीच होऊ शकत नाही. अशा अविर्भावात अवैध व्यावसायिक खुले आम आपले व्यवसाय करत आहे. अवैध व्यवसायामुळे शहरात हाणामाऱ्याच्या घटना वाढत आहे.

 अवैध दारू विक्री अवैध सर्रासपणे सुरू आहे. मटकाकिंगने आपले व्यवसाय थाटला आहे. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. याकडे पोलिस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे असल्याने अवैध धंद्यांनी कळस गाठल्याचे चित्र दिसत आहे। झटपट पैसे कमावण्याचे आमिष दाखवून जुगार मटका चालक ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना आकर्षित करीत असल्याचे चित्र आहे. यामध्ये तरुणांसह व वृद्ध नागरिकांचा समावेश असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे


 कोपरगाव पोलिसांनी एक आरोपी पकडला या कामगिरीने हुरळून न जाता वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत