कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनेसाठी पत्रकार- तहसीलदार यांच्यात ऑनलाईन चर्चासत्र - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनेसाठी पत्रकार- तहसीलदार यांच्यात ऑनलाईन चर्चासत्र

राहूरी (गोविंद फुणगे ) राहुरी तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवरील सुचना,उपाय आणि मार्गदर्शनपर तालुक्यातील पञकार आण...

राहूरी (गोविंद फुणगे)

राहुरी तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवरील सुचना,उपाय आणि मार्गदर्शनपर तालुक्यातील पञकार आणि तहसीलदार यांच्यामधे संयुक्त ऑनलाईन चर्चासञ संपन्न झाले.प्रशासन आणि पञकार यांच्यामधे सकारात्मक झालेल्या चर्चेने पञकारांनी समाधान  व्यक्त केले. 

  
रविवारी दुपारी कोरोना च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पञकारांनी एकञ येत उपाययोजना आणि मार्गदर्शन करण्यासारखे पञकार प्रसाद मैड यांच्या संकल्पनेतुन गुगल मिरच्या आधारे ऑनलाइन चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.यामधे तालुक्याके कर्तव्यदक्ष तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनीशसहभाग नोंदवत प्रशासनाची भुमिका स्पष्ट केली.यावेळी पञकारांनी राहुरी कृषी विद्यापीठातील कोविड सेंटर मधे स्वतंञ कोविड रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी तर देवळाली नगरपालिकेच्या आणि वांबोरी येथोल कोविड सेंटर बाबद लक्ष वेधले असता तहसीलदार शेख यांनी सांगितले की,कोविड सेंटर कडे स्वतंञ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे तर देवळाली नगरपालिकेच्या कोविड सेंटर पुन्हा पुर्वरत करण्यात येणार असुन गरज पडल्यास शासनाकडे हस्तांतरित करूण अद्यावत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे तर वांबोरी येथे देखील अद्ययावत कोविड सेंटर उभारण्यात येढार आहे.तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर गावागाधात ग्राम दक्षाता समिती काम करत आहे.माञ काही ठिकाणी सरपंच व पोलिस पाटील यांचे पद रीक्त आहे तेथे गावातील पञकांरांनी देखील सहभाग नोंदवावा तसेच तालुक्यात देखील या समिती बरोबर पञकारांनी देखील जनजागृतीसाठी सक्रिय सहभागी व्हावे त्याच बरोबर तालुक्यातील नागरीकांनी देखील मास्क वापरने सुरक्षित अंतर ठेवणे त्याच बरोबर तालुका प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार शेख यांनी केले.

  सदर चर्चासञात निसारभाई सय्यद ,संजय कुलकर्णी , रफिकभाई शेख , गणेश विघे , प्रसाद मैड, विनीत धसाळ,श्रीकांत जाधव ,गोविंद फुणगे ,आकाश येवले ,दादासाहेब पवार ,जालिंदर ढोकणे,बाळासाहेब नवगिरे,चंद्रकांत लातुरकर आदिंसह तालुक्यातील पत्रकार सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत