कोपरगाव(वेबटीम) कोरोनाच्या दुसरी लाटेमध्ये कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असून त्या दृष्टीने प्रशासनाने योग्य त्याअनुषंगाने ...
कोपरगाव(वेबटीम)
कोरोनाच्या दुसरी लाटेमध्ये कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असून त्या दृष्टीने प्रशासनाने योग्य त्याअनुषंगाने कोपरगाव प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे.
(१) सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. रात्री ८ ते सकाळी ७ दरम्यान ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रती व्यक्ती रू. १००० दंड आकारण्यात येईल.
(२) अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर किंवा फिरण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ या कालावधीत निर्बंध राहील.
(३) शासनाने रात्री ८.०० ते सकाळी ७.०० कर्फ्यु जाहीर केला असून सर्व व्यवसायिक, नागरिक यांनी याची दखल घेवून. आपली आस्थापने/ दुकाने याकलावधी बंद ठेवावे.
(३ -अ) सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ दरम्यान बंद राहतील. उल्लंघन केल्यास प्रती व्यक्ती रू. १००० दंड आकारण्यात येईल.
(४) विनामास्क आढळलेल्या व्यक्तीस रू. ५०० दंड आकारनेत येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळलेल्या व्यक्तीस रू. १००० दंड आकारानेत येईल.
*घरी राहा.... सुरक्षित राहा*....
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना लक्षणे असलेली व्यक्ती आढळून आल्यास त्वरित शासकीय यंत्रणेस कळवावे.
असे आवाहन तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे,शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत