कोपरगाव(वेबटीम) गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेला असून अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच एक वर्षापासून स...
कोपरगाव(वेबटीम)
गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेला असून अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच एक वर्षापासून संपूर्ण अर्थव्यवस्था देखील कोलमडली असून लॉकडाऊनच्या कालावधी मधील अनेक सर्वसामान्य व्यवसायिक तसेच मजूर कामगार यांचा प्रचंड आर्थिक नुकसान झालेला असून आता परत महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे.
तरी कोपरगाव सह जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम व अटी पळून महाराष्ट्राला व आपल्या देशाला या संकटातून बाहेर निघण्यास मदत करावी जेणेकरून पुन्हा लॉकडाऊन होणार नाही कारण आता लॉकडाऊन झाले तर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत