राहूरी फॅक्टरी(श्रीकांत जाधव) राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील वैभव संकलेचा यांच्या मालकीच्या फॅशन शु पॅलेस या दुकानात आज दुपारी...
राहूरी फॅक्टरी(श्रीकांत जाधव)
राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील वैभव संकलेचा यांच्या मालकीच्या फॅशन शु पॅलेस या दुकानात आज दुपारी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आल्यानंतर तहसीलदार एफ.आर.शेख व पोलीस निरिक्षक हनुमंत गाडे यांनी सदर दुकान ७ दिवसासाठी सील केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात ज्या आस्थापनामध्ये गर्दी आढळून येईल अशा आस्थापना ७ दिवस सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. आज दुपारी राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख व पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे राहूरी फॅक्टरी परिसरात असताना नगर-मनमाड मार्गालगत वैभव संकलेचा यांच्या मालकीच्या फॅशन शु पॅलेस या दुकानात जास्त गर्दी आढळून आल्यानंतर तहसीलदार शेख यांनी सदर दुकान ७ दिवस सील करण्याचे नगरपालिका मुख्याधिकारी अजित निकत यांना कळविले त्यानुसार नगरपालिका कार्यालयीन अधिक्षक बन्सी वाळके, भरत साळुंके, सोमनाथ उर्फ पिंटू सूर्यवंशी, अशोक पंडित, रोहित पँडीत, सखाहरी सरोदे आदीसह पथकाने सदर दुकान ७ दिवस सील केले आहे.
तहसीलदार शेख यांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे राहूरी फॅक्टरी परिसरातील व्यापाऱ्यांत घबराट पसरली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहन तहसीलदार शेख यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत