राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फँक्टरी गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी येथील नागरीकांनी रास्तारोको आंदोलन छेडले.पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फँक्टरी गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी येथील नागरीकांनी रास्तारोको आंदोलन छेडले.पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या आश्वासना नंतरही गुन्हेगारी पाठशिवणीचा खेळ काय बंद होईना.राहूरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत व गुरुकुल वसाहत , समर्थनगर येथे अनेक बंद बंगल्याची कुलपे तोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. आदिनाथ वसाहतीत येथे ५ तोळे घरात प्रवेश करून चोरट्यांनी लांबविले आहेत. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अपयशी ठरत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
रविवारी मध्यरात्री राहुरी फॅक्टरी येथील आदीनाथ वसाहत व गुरुकुल वसाहत येथे चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. ज्या घराला कुलूप दिसलं त्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश करून सामानांची उचकापाचक केली आहे. मात्र घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याने किती मुद्देमाल चोरीला गेला हे मात्र समजू शकले नाही.
आदिनाथ वसाहत येथे किरण चव्हाण यांच्या बंगल्याला दोन दरवाजे आहेत. एका दरवाजाला कुलूप लावलेले होते. तर दुसऱ्या दरवाजाला आतून कडी लावून चव्हाण कुटूंबिय झोपलेले होते. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी भिंतीवरून उडी मारुन आत प्रवेश करून ज्या दरवाजाला कुलूप लावलेले होते ते तोडून आत बंगल्यात प्रवेश केला.बंगल्यातील कपाटाची उचकापाचक करत कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले २ तोळे सोन्याची अंगठी, १ तोळ्यांची अंगठी तसेच दोन तोळ्यांचं मिनी गंठण असा एकूण ५ तोळ्यांचा सोन्याचा ऐवज लंपास केला.
किरण चव्हाण यांना कुत्रे भुंकन्याचा व गाडीचा आवाज येताच त्यांनी बाहेर येऊन बघितले तर एक चोरटा पळताना दिसला. त्यानंतर आपल्या बंगल्यातील रूममध्ये बघितले असता कपाटातील सर्व सामान उपकपाचक करुन अस्थाव्यस्थ पडलेले दिसले. चव्हाण यांनी कपाटातील सोन्याचे दागिने शोधले असता सोन्याचे दागिणे चोरी गेल्याचे आढळून आले. चोरी झाल्याचे समजताच स्थानिक नागरीकांनी एकत्रित होऊन शोध घेतला मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले होते. या चोरट्यांनी आदिनाथ वसाहत भागातील चार बंगल्यांचे कुलूप व कडी कोयंडे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
दरम्यान येथील शरीफ शेख यांच्या बंगल्यात चोरटे घुसण्याच्या प्रयत्नात असताना बाहेर झोपलेल्या वयस्कर आजी जाग्या असल्याने चोरट्यानी तेथून काढता पाय घेतला. चोरटे बंगल्यात शिरतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.सी.सी टिव्ही फुटेज मध्ये पाच चोरटे दिसत आहे.
गुरुकुल वसाहत येथील अँड. अंजली नवगिरे यांच्या बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून बमगल प्रवेश करून सामानाची उचकापाचक केली.परंतु घरातील सदस्य बाहेरगावी गेले असल्याने मुद्देमाल गेला की नाही? हे स्पष्ट झाले नाही. तर बाहेरगावी गेलेल्या राजेंद्र पाटोळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सामानांची उचकापाचक केली आहे.
राहूरी फॅक्टरी परिसरात रस्तेलुट, धूम स्टाईल चोरी, व्यापाऱ्यांना धमकावणे, चोरी, छेडचाफा आदी घटनाय दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुकुल वसाहत, आदिनाथ वसाहत, समर्थनगर येथे रात्रीत चोरट्यांनी धिंगाणा घालून मुद्देमाल लंपास केला आहे. राहूरी पोलीस गुन्हेगारी रोखण्यात अपयशी थर असल्याने नागरिकांना सोबत घेऊन राहूरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिला आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत