कोपरगाव(वेबटीम) नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान म्हणून कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे सूत्र...
कोपरगाव(वेबटीम)
नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान म्हणून कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे सूत्र एक दिवसासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (प्रभाग क्र.11) नगरसेविका श्रीमती वर्षाताई हिरामण गंगुले यांचेकडे सुपूर्द केले.
यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,जेष्ठ नगरसेवक भाजपा गटनेते श्री.रविंद्र पाठक, राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके, शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल,मंदार पहाडे,नगरसेविका माधवी वाकचौरे,वर्षा शिंगाडे,हर्षा कांबळे, सुवर्णा सोनवणे,उप मुख्याधिकारी सुनील गोर्डे,मेहमूद सय्यद,सुनील गंगुले,सर्व महिला अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येकाने आधी स्वतःच्या घरातील महिला,कामवाली,धुणे भांडे करणाऱ्या,स्वच्छता कामगार यांच्याशी सन्मानपूर्वक वागावे व नंतर जागतिक महिला दिन साजरा करावा.राजमाता जिजाऊ माता,अहिल्यादेवी होळकर,सावित्रीबाई फुले यांचे गुणगान करणाऱ्या समाजात महिलांचे शोषण,बलात्कार होणे दुर्दैवीच आहे,असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.सर्व महिला नगरसेविका, अधिकारी,कर्मचाऱ्यांचा यावेळी नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत