कोपरगाव(वेबटीम) डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर ना उच्च न्यायालयाचा आदेश असताना व त्या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड असताना देखील सर्रास या आदे...
कोपरगाव(वेबटीम)
डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर ना उच्च न्यायालयाचा आदेश असताना व त्या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड असताना देखील सर्रास या आदेशाची पायमल्ली होताना दिसत असून या वर नेमकी कोण कारवाई करणार असा प्रश्न लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
अनेक दिवसांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेले डॉ आंबेडकर मैदान अखेर काँक्रीटीकरण करून सुसज्ज करण्यात आले शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या मैदानावर उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशाने कोणी अतिक्रम करू नये व या ठिकाणी गाड्या पार्किंग करून नये असे दोन ठिकाणी बोर्ड लावण्यात आले. मात्र न्यायालयाने आदेश देऊन व या ठिकाणी नो पार्किंग चे बोर्ड लावून देखील या आदेशाची पायमल्ली करत बिनधास्त पणे गाड्या पार्किंग केल्या जात आहेत त्यामुळे वाहतुकी ला अडथळा होत आहे हा भाग असला तरी अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नेमकी नगर पालिकेची आहे की पोलीस स्टेशनची या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून अशा प्रकारे न्यायालयाच्या होणाऱ्या आदेशाची पायमल्ली होत असेल तर सर्व सामान्य व्यक्तीला कायद्याची भीती राहणार नाही असे या पत्रकात म्हटले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत