बेलापूर(शरद पुजारी) श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द परिसरात दहशत निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात अडकला असून हा बिबट्या पाहण्य...
बेलापूर(शरद पुजारी)
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द परिसरात दहशत निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात अडकला असून हा बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या काही महिन्यापासून बेलापूर खुर्द परिसरात दबा धरून बसलेल्या बिबटयाने आजपर्यंत आजपर्यंत निरज प्रमोद पुजारी,आशिष पुजारी , शांताबाई जाधव, संजय लोखंडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते.
या भागात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली असता बालू पुजारी ,धनंजय पुजारी यांनी सूर्यकांत लांडे साहेब, गोरक्षनाथ सुराशे साहेब यांच्या सहकार्याने अजितराव देशमुख यांच्या गट नं २५८ मधील शेतात पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटे बिबटया अलगत पिंजऱ्यात अडकला व त्याने डरकाळ्या फोडण्यास सुरवात केली. या आवाजाने परिसरात लोकांनी पिंजऱ्याकडे धाव घेऊन बघितले असता त्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसतात बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.
याकामी बेलापूर खुर्दचे उपसरपंच अँड. दीपकराव बाराहाते, ग्रामपंचायत सदस्या प्रणालीताई भगत, राहुल भगत, ग्रा. स.दिलीप भगत , विनय भगत, प्रल्हाद पुजारी,निरज पुजारी,सत्यजीत देशमुख, धनंजय पुजारी, बालू पुजारी,अमोल पुजारी, मनोज पुजारी,बाळू पुजारी, रमेश पुजारी, सुरेश भगत, सुरेश पुजारी, मनोज पुजारी, माजी उपसरपंच शरद पुजारी, शशीकांत पुजारी, गणेश पुजारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत