कोपरगावातील दुकाने फोडणारा २४ तासाच्या आत जेरबंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावातील दुकाने फोडणारा २४ तासाच्या आत जेरबंद

  कोपरगाव प्रतिनिधी  कोपरगाव शहर पोलीसांनी पैठणी साड्यांचे शोरुमचा पत्रा कापुन चोरी करणारे पर जिल्हयातील आरोपी सिसीटीव्ही फुटेजच्या साह्याने...

 कोपरगाव प्रतिनिधी

 कोपरगाव शहर पोलीसांनी पैठणी साड्यांचे शोरुमचा पत्रा कापुन चोरी करणारे पर जिल्हयातील आरोपी सिसीटीव्ही फुटेजच्या साह्याने २४ तासाच्या आत अटक केल्याची कार्यवाही केली आहे.

दि १ मार्च २०२१ रोजी रात्री १२ वा सुमारस कोणीतरी अज्ञात आरोपीने येवला रोड येथील चंद्राहास पैठणी  शोरुम व कोपरगाव साडी सेंटर,साईस्वरुप यमाहा बाईक व समर्थ इलेक्ट्रीक असे चार शोरुमचा पत्रा कापुन आत प्रवेश करुन ५२०००/- रु किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.याबाबत मनोज लक्ष्मीनारायण जोशी यांचे तक्रारीवरुन कोपरगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाहोता. सदर गुन्हयाचा तपास चालु असतानाचा यातील अज्ञात आरोपी याने पुन्हा दि १० मार्च २०२१ रोजी रात्री १२ वा सुमारस चंद्रहास पैठणी साडी शोरुम व कोपरगाव साडी सेंटरचा पत्रा कापुन २०७००/- रु किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता यावरुन फिर्यादी  नामे चंद्रहास प्रभाकर भांडगे रा येवला यांचे तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता

सदर गुन्हयाचा तपास करताना पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील , अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर दिपाली काळे , उपविभागिय पोलीस अधिकारी शिर्डी श्री संजय सातव ,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोसई नागरे सो, पोहेका दिलीप तिकोणे , पोहेका राजु पुंड , पोका सुरज अग्रवाल , पोका सचिन शेवाळे व पोका राम खारतोडे यांनी घटनास्थळावरिल सिसिटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी याने अंगावर साडी घेउन गुन्हा केल्याचे दिसुन आले त्याआधारे कोपरगाव शहरातील अशोका होटेल ते साई कॉर्नर रोडवरिल सर्व सिसिटीव्ही चेक करुन गुप्त बातमीदारा मार्फत जळगाव जिल्हयातील अंमळनेर येथील रहीवासी असलेला आरोपी नामे संजय अर्जुन पाटील (वय ४० वर्ष रा शिरुर नाका शिवाजी नगर अंमळनेर जि जळगाव) यास कालीकानगर शिर्डी परिसरात मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे त्याने कोपरगाव , राहता येथे अशाच प्रकारच्या रात्री पत्रा कापुन चोरी केल्याची कबुली दिली आहे.



सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री. मनोज पाटील सो, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर सौ. दिपाली काळे मॅडम, उपविभागिय पोलीस अधिकारी शिर्डी श्री.संजय सातव सो.,पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले सो ,यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोसई भरत नागरे सो ,पोहेका ३९१ आर पी पुंड, पोहेका १७७७ डि आर तिकोणे, पोका २५११ एस जे अग्रवाल, पोका सचिन शेवाळे पोका राम खारतोडे व सफी जगधने यांनी केली आहे.


कोपरगाव शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना आज आरोपी पकडल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत असले तरी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत