देवळाली प्रवरा(वेबटीम) केवळ बंदबाबत चर्चा अथवा निर्णय घेण्यासाठी व्यापारी संघटना स्थापन केली नसून देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेच्या माध्य...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
केवळ बंदबाबत चर्चा अथवा निर्णय घेण्यासाठी व्यापारी संघटना स्थापन केली नसून देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यापाऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जाणार असल्याचे प्रतिपादन देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतिष वाळूंज यांनी केले.
राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे व्यापारी संघटनेची स्थापना करण्यात आली असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा मंगळवारी संपन्न झाला.
या संघटनेच्या अध्यक्षपदी सतीश वाळुंज, कार्याध्यक्षपदी विश्वास पाटील तर उपाध्यक्षपदी अशोक गाडेकर व युसूफ तांबोळी यांची निवड करण्यात आली असून प्रत्येक व्यवसायाचा एक प्रतिनिधीला कार्यकारीनित स्थान देण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी व्यापारी संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रसंगी सतीश वाळुंज बोलत होते.
यावेळी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, नगरसेवक सचिन ढुस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र ढुस, नगरसेवक संजय बर्डे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राहूरी फॅक्टरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णू गीते, उपाध्यक्ष सुनील विश्वासराव आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नवनियुक्त उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जालिंदर मुसमाडे, सूर्यकांत शिंगी, सूर्यकांत लासुरकर, आबा कदम, अजीज शेख, अशोक मुसमाडे, किरण लासुरकर, गौतम भागवत, अशोक कदम,अनिल कदम, संजय माळवे, संतोष मुथ्था, नाना होले, विजय कदम, आदीनाथ कडू,सुरेश अंबिलवादे, सुभाष कडू, अनिल चावरे, सोमनाथ कोळसे, अब्बास पटेल, संजय सिनारे, संतोष मुसमाडे, सुभाष कडू,शशी मिसाळ, बाबासाहेब देशमुख, सुरेश अंबिलवादे आदींनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत