कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील कोकमठान येथील ओम गुरुदेव आश्रमातील एका ज्येष्ठ संत महाराज यांना कोरोनाची लागण झाल्याने ते आत्मा माल...
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठान येथील ओम गुरुदेव आश्रमातील एका ज्येष्ठ संत महाराज यांना कोरोनाची लागण झाल्याने ते आत्मा मालिक रुग्णालयात उपचार घेत असताना काल दि १८ मार्च रोजी निधन झाले असता शासकीय नियमानुसार कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू नंतर सदर मृतदेह प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळुन देण्याचा नियम असतांना आत्मा मालिक हॉस्पिटल च्या प्रशासनाने महाराजांचा मृतदेह प्लास्टिक मध्ये न गुंडाळता तसाच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या कोरोना रुग्णाबाबत आणि त्या रुग्णाचा मृत्यूनंतरही निष्काळजीपणा दाखविल्यामुळे जनतेत संतापाची लाट पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि एव्हेर हेल्थ द्वारा संचालित आत्मा मलिक रुग्णालयात ओम गुरुदेव आश्रमातील संत अमरगिरीजी महाराज कोरोनावर उपचार घेत होते . उपचारादरम्यान त्याचे निधन झाले . त्यांचा मृतदेह नातलग तसेच अनुयायांच्या ताब्यात देताना कोरोनाबाधित मृत व्यक्तीबाबत शासनाने आखून दिलेले सर्व नियम पायदळी तुडविले . मृतदेह निर्जंतुक करून प्लॅस्टिकच्या आवरणात गुंडाळून देणे आवश्यक असताना रुग्णालय प्रशासनाने मृतदेह तसाच नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यानंतरही हा प्रकार एव्हढ्यावरच न थांबता मयत व्यक्ती दीक्षांत साधू असल्याचे कारण सांगत त्यांच्यावर दहन संस्कार न करता त्यांना समाधी देणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांचा मृतदेह आहे त्या स्थितीत अनुयायांनी ताब्यात घेतला . याबाबतची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून संबंधितांना समज दिली आणि मृतदेहाचे दहन करण्यात आले. या दरम्यान अंत्यसंस्कारासाठी केवळ वीस लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असताना शेकडोचा जनसमुदाय हजर होता . यामुळे तहसीलदार चंद्रे यांनी संबंधितांना कारवाईचे आदेश दिले होते . त्याप्रमाणे कोकमठाणचे ग्रामसेवकांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आत्मा मलिक रुग्णालय व्यवस्थापन व संबंधित डॉक्टर तसेच अंत्यविधीस उपस्थित असलेल्या समुदायावर साथ रोग प्रतिबंधक कायदयानुसार कलम १८८. २६९,२७०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत