कोपरगाव प्रतिनिधी नुकतीच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अ. जा विभागाच्या महिला आघाडी कोपरगाव तालुका अध्यक्ष पदी कुमारी रत्नमाला यादवराव त्रिभ...
कोपरगाव प्रतिनिधी
नुकतीच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अ. जा विभागाच्या महिला आघाडी कोपरगाव तालुका अध्यक्ष पदी कुमारी रत्नमाला यादवराव त्रिभुवन यांची निवड झाल्याबद्दल कोपरगाव येथील ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेच्या वतीने अध्यक्ष परशराम साबळे यांनी सत्कार केला.
यावेळी बोलतांना त्रिभुवन म्हणाल्या की, मला मिळालेल्या तालुका अध्यक्ष पदाचा वापर मी समाजातील दिन दुबळ्या निराधार लोकांना आधार देण्याचे कार्य करत पक्ष बळकटी साठी पुरेपूर प्रयत्न करत पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम मी सर्वांसोबत एकजुटीने करेल, तसेच सामाजिक काम करत असतांना कोणाच्याही भावना दुखावणार नाही असे कार्य मी करून दाखवेन.
यावेळी काँग्रेस पक्षाचे अ. जा. विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष यादवराव त्रिभुवन, निलेश देवकर आदी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत